आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयातच स्मिताच्या मुलाला जडले होते ड्रगचे व्यसन, शेअर केल्या अनेक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिता पाटील आणि प्रतीक बब्बर - Divya Marathi
स्मिता पाटील आणि प्रतीक बब्बर
मुंबई: दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने एका मुलाखतीत खासगी आयुष्यातील धक्कादायक खुलासे केले. यादरम्यान त्याने एमी जॅक्सनसोबतची लव्हस्टोरीसुध्दा शेअर केली. त्याने सांगितले, की त्याला कमी वयातच ड्रगचे व्यसन जडले होते. वयाच्या 19व्या वर्षी तो रेहेब सेंटरमधून बाहेर आला होता. त्याने आजीच्या निधनाला आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान असल्याचे सांगितले.
ब्रेकअपनंतर वाटले, आयुष्यात काहीच उरले नाही...
प्रतीक सांगतो, 'एमीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मला काहीच सुचत नव्हते. असे वाटायचे, की आयुष्यात काहीच उरले नाहीये. खूप रिकामे रिकामे वाटत होते. माझ्या आयुष्यात कुणाचेतरी असणे खूप महत्वाचे आहे. माझे परिचयाचे लोक मला म्हणतात, की मी माझ्या आयुष्यात एका महिलेचे कमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण मला आई नाहीये आणि माझ्या आजीने माझे संगोपन केले.'
का जडले ड्रगचे व्यसन...
प्रतीक सांगतो, 'मी खूप लहान असताना ड्रगच्या आहारी गेलो होतो. वयाच्या 19व्या वर्षी मी रेहेब सेंटरमधून बाहेर आलो. कारण मी इमोशनली खचलो होतो. मी मुर्ख आणि विद्रोही टाइपचा होतो. मागील तीन वर्षांत मी रेहेबमध्ये नव्हतो. परंतु ड्रग घ्यायचो. डिप्रेशन, फेल्ड रिलेशनशिप आणि आजी, जी माझ्यासाठी सर्वकाही होती. तिच्या निधनाने मी खचलो होतो.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा प्रतीक कोणकोणत्या गोष्टी शेअर केल्या...
बातम्या आणखी आहेत...