आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युषाप्रमाणेच जिया खानने केली होती आत्महत्या, बॉयफ्रेंडच ठरला होता मृत्यूला जबाबदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः डावीकडे -  प्रत्युषा बॅनर्जीचे पार्थिव, इनसेटमध्ये तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह, उजवीकडे - जिया खानचे पार्थिव, इनसेटमध्ये जियाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सूरज पांचोली - Divya Marathi
फोटोः डावीकडे - प्रत्युषा बॅनर्जीचे पार्थिव, इनसेटमध्ये तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह, उजवीकडे - जिया खानचे पार्थिव, इनसेटमध्ये जियाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सूरज पांचोली
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येस तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवारी राहुलला प्रत्युषा गळफास घेतलेल्या अवस्थेत घरी आढळली होती. त्यानेच तिला रुग्णालयात नेले होते, मात्र नंतर तेथून तो पसार झाला होता. शनिवारी तो सकाळी रुग्णालयात पोहोचला. राहुल घटस्फोटित असून एका तरुणीसोबत मिळून तो प्रत्युषाला टॉर्चर करत असल्याचे म्हटले जात आहे. आता यात किती तथ्य आहे, याचा शोध पोलिस घेणार आहेत. सध्या राहुलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणामुळे अभिनेत्री जिया खानची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचे कारण म्हणजे जियानेसुद्धा अगदी कमी वयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. जियाच्या मृत्यूस तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला जबाबरदार ठरवण्यात आले होते. सूरजने प्रेमात दिलेला दगा जिया पचवू शकली नाही आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे म्हटले जाते. मात्र अद्याप जियाच्या मृत्यूचे खरे कारण उघड झालेले नाही.
3 जून 2013 रोजी जिया खानने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोली याला 10 जून 2013 रोजी अटक करण्यात आली. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला आहे. 2 जुलै रोजी सूरजची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

पुढे वाचा, दोघींच्याही मृतदेहावर आढळल्या जखमा...