आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Ex Boyfriend Makrand Malhotra

EX बॉयफ्रेंडने दिली होती प्रत्युषाला जीवे मारण्याची धमकी, दाखल झाली होती FIR

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः एक्स बॉयफ्रेंड मकरंद मल्होत्रासोबत प्रत्युषा बॅनर्जी - Divya Marathi
फाइल फोटोः एक्स बॉयफ्रेंड मकरंद मल्होत्रासोबत प्रत्युषा बॅनर्जी

मुंबईः 'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. याप्रकरणी पोलिस प्रत्युषाचा सध्याचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह आणि पुर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड मकरंद मल्होत्राची चौकशी करु शकते. 2013 मध्ये प्रत्युषाने मकरंद मल्होत्राच्या विरोधात ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

कोण आणि मकरंद आणि कसे झाले होते दोघांचे ब्रेकअप...
- मकरंद मल्होत्रा मुंबईतील एक बिझनेसमन आहे. बिझनेसशिवाय अभिनयातदेखील त्याने आपले नशीब आजमावले आहे.
- प्रत्युषा आणि मकरंद 2009 पासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2013 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते.
- प्रत्युषाने मकरंदविरोधात गैरवर्तन आणि तिच्या वडिलांला वाईट वागणूक दिल्याचा आरोप लावला होता.
- त्यावेळी मकरंदने प्रत्युषाने लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते.
- त्याच्या मते, प्रत्युषा राहुलसोबत रिलेशनशिपमध्ये आल्याने त्याच्यावर असे आरोप करत आहे.

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल फरार, एक्स धावून आला मदतीला...
- बातमीनुसार, शुक्रवारी प्रत्युषाचे पार्थिव रुग्णालयात घेऊन आल्यानंतर तिचा सध्याचा बॉयफ्रेंड राहुलने तेथून पळ काढला.
- सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिस राहुल राज सिंहचे लोकेशन शोधत आहे.
- पिंक विलाच्या एका रिपोर्टनुसार, राहुल फरार झाल्यानंतर प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड मकरंद मल्होत्रा प्रत्युषाच्या कुटुंबीयांना जमशेदपूरहून मुंबईत आणण्यासाठी मदत करतोय.
- सध्या प्रत्युषाचे पार्थिव मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात असून लवकरच तिचे शवविच्छेदन करण्यात येणारेय.

पुढे पाहा, मकरंद आणि प्रत्युषाची निवडक छायाचित्रे...