आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Did Pratyusha Tell Rahul Raj Singh On Phone That She’ll Commit Suicide

खुलासाः आत्‍महत्‍येपूर्वी प्रत्‍युषाने केला होता राहुलला कॉल, वकिलाचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रत्‍युषा बॅनर्जीने आत्‍महत्‍यापूर्वी प्रियकर राहुलला फोन करून आत्‍महत्‍या करत असल्‍याचे सांगितले होते, असा दावा सोमवारी मुंबई उच्‍च न्‍यालयात सरकारी वकिलाने केला. तीन मिनिटांच्‍या या संभाषणांचे रेकॉर्डिंग न्‍यायाधीश मृदुला भाटकर ऐकणार आहेत. यापूर्वी वकिलाने प्रत्यूषाचा खुन झाल्‍याचा दावा केला होता.
1 एप्रिल रोजी काय झाले होते ?
- राहुलने सांगितले, 'प्रत्युषा आणि मी कॉमनफ्रेंडसोबत पार्टी केली आणि रात्रभर गप्पा मारल्या.'
- 1 एप्रिल सकाळी 8:30 वाजता आम्ही नाश्ता करायचा विचार केला. जर आम्ही घरातच खाण्यासाठी काही बनवले असते तर हे सर्व घडले नसते.
- मी उठलो तेव्हा प्रत्युषा अंघोळीला गेली होती. त्यानंतर ती पुन्हा ड्रिंक करायला लागली.
- तिला मद्यपान करायची सवय होती. मी तिला विरोध केला आणि जेवण आणण्यासाठी बाहेर गेलो.
- मी परत आलो आणि दाराची बेल वाजवली तर स्वीच ऑफ होती. माझी चावी काम करत नव्हती, कारण डबल लॉक होते.
- मी दार वाजवले, परंतु काहीच प्रतिसाद आला नाही. मी फोन, मेसेज केले.
- मी खाली उतरलो आणि कुलुप दुरुस्त करणा-या व्यक्तीकडून दुसरी चावी बनवण्याचा विचार करत होतो. त्यावेळी आमचा नोकर आला. मी त्याला बाल्कनीतून घराचे दार उघडण्यास सांगितले.
- घरात जाताच प्रत्युषा पंख्याला लटकलेली दिसली. मी धावत तिच्याकडे गेलो आणि तिच्या पायांना खांद्यावर ठेवले.
- कुलूप दुरुस्त करणा-या व्यक्तीने तिची ओढणी कापली. मी तिच्या चेह-यावर पाणी शिंपडले. तिच्या छातीला पम्प केले. तिच्यात श्वास भरण्यासाठी माऊथ-टू माऊथ प्रासेस केले.
- त्यानंतर मी लगेच तिला खाली घेऊन गेलो. मी कारमध्ये तिच्या शेजारीच बसलेलो होतो. तणावात आलो आणि सर्व सिग्नल तोडून रुग्णालयात पोहोचलो.
प्रत्युषाच्या प्रेग्नेंसीविषयी राहुलने काय सांगितले...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी राहुलला प्रत्युषाच्या गर्भपाताविषयी सविस्तर माहिती मागितली.
- राहुलने सांगितले, 'जेव्हा प्रत्युषाने सांगितले, की पीरियड्स मिस होताय, तेव्हा आम्ही प्रेग्नेंसी टेस्टसाठी डॉक्टरांकडे गेलो. त्यानंतर आम्ही गर्भपाताचा निर्णय घेतला. कारण आमचे लग्न झालेले नव्हते, आम्ही केवळ लिविंगमध्ये राहत होतो.'
- 'मी तिला गर्भपातासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. परंतु तिथे खूप उशीर झाल्याने तिने मला तिथून जाण्यास सांगितले.'
- मात्र, दुस-या दिवशी मी पुन्हा त्या डॉक्टरांकडे तिच्यासाठी औषधे आणण्यासाठी गेलो.
- आम्ही आमचे भविष्य लक्षात घेऊन गर्भपाताचा निर्णय घेतला होता, कारण आम्ही नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आत्‍महत्‍येपूर्वी नशेत होती प्रत्‍युषा...