आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Was Badly Drunk At Time Of Suicide

आत्महत्येपूर्वी खूप नशेत होती प्रत्युषा, केमिकल रिपोर्टमधून झाला खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1 एप्रिल रोजी प्रत्युषाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून तिचा बॉयफ्रेंड राहुलराजवर संशय आहे. - Divya Marathi
1 एप्रिल रोजी प्रत्युषाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून तिचा बॉयफ्रेंड राहुलराजवर संशय आहे.
मुंबई - टीव्ही अभिनेत्री प्रत्युषाने १ एप्रिलला आत्महत्या करण्यापूर्वी मद्यप्राशन केले होते. कलिनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील रासायनिक विश्लेषण अहवालानुसार तिच्या शरीरात १३० मिलिग्रॅम अल्कोहोल आढळले. डॉक्टरनुसार, शरीरात ३० एमजीपेक्षा जास्त अल्कोहोल नसावे. पोलिसांना प्रत्युषाच्या घरून बिअरच्या तीन कॅन व दारूच्या बाटल्या मिळाल्या होत्या. तपासानुसार, आत्महत्येच्या एका दिवसाआधी प्रत्युषा व राहुलने पार्टी करून मद्यप्राशन केले होते. त्यावरून त्यांचे भांडणही झाले होते.


राहुलनेही सांगितले होते- आत्महत्येपूर्वी नशेत होती प्रत्युषा


- प्रत्युषाचा व्हिसेरा आणि युट्रेस सॅम्पल पोलिसांनी कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते.
- त्याचा अहवाल आला असून, प्रत्युषाच्या शरीरारत इथाइल अल्कोहल सापडले. त्याचे प्रमाण 135mg होते.
- याचा अर्थ आहे, की प्रत्युषा अति नशेत होती.
- डॉक्टरांचे म्हणणे आहे, की शरीरामध्ये 30 mg पेक्षा जास्त अल्कोहल असू नये.
- जर अल्कोहलचे प्रमाण 100mg पेक्षा जास्त झाले तर व्यक्तीला व्यवस्थित बोलता येत नाही. तिला विस्मृती होते आणि ती बेशुद्धीच्या अवस्थेत जाते.
- 135 mg हे प्रमाण 'अतिशय' या श्रेणीत मोडते. एवढे अल्कोहल शरीरात गेले तर मृत्यूचा धोका वाढतो. व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते. तिचा स्वतःवर ताबा राहात नाही. शक्यता आहे, की प्रत्युषाच्या प्रकरणात असेच झाले असावे.
पुढील स्लाइडमध्ये,
>> आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने केला होता गर्भपात...
>> 1 एप्रिलाला काय-काय घडले होते?