आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Told Rahul Raj Singh During That Call That She Is To Commit Suicide

आत्महत्येपूर्वी प्रत्युषा कुणासोबत बोलली होती 3 मिनिट, वकीलाने केला खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येने आणखी एक वळण आले आहे. - Divya Marathi
प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येने आणखी एक वळण आले आहे.
मुंबई: प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सोमवारी (25 एप्रिल) बॉम्बे हायकोर्टात सरकारी वकीलाने दावा केला, 'प्रत्युषाने आत्महत्येपूर्वी राहुलला फोन केला होता. त्यादरम्यान ती म्हणाली होती, की ती आत्महत्ये करत आहे.' आता न्यायमूर्ती मृदुला भाटकर प्रत्युषा आणि राहुल यांच्यातील तीन मिनिटांची अखेरची बातचीतचे रेकॉर्डिंग ऐकणार आहे. वकिलांनी इशारा केला, की अभिनेत्रीची हत्या झाली आहे. प्रत्युषाने 1 एप्रिलला आत्महत्ये केली होती. तेव्हापासून बॉयफ्रेंड राहुल राज सिंह संयशाच्या घे-यात आहे.
1 एप्रिलाला काय-काय घडले होते?
- राहुलने सांगितले, 'प्रत्युषा आणि मी कॉमनफ्रेंडसोबत पार्टी केली आणि रात्रभर गप्पा मारल्या.'
- 1 एप्रिल सकाळी 8:30 वाजता आम्ही नाश्ता करायचा विचार केला. जर आम्ही घरातच खाण्यासाठी काही बनवले असते तर हे सर्व घडले नसते.
- मी उठलो तेव्हा प्रत्युषा अंघोळीला गेली होती. त्यानंतर ती पुन्हा ड्रिंक करायला लागली.
- तिला मद्यपान करायची सवय होती. मी तिला विरोध केला आणि जेवण आणण्यासाठी बाहेर गेलो.
- मी परत आलो आणि दाराची बेल वाजवली तर स्वीच ऑफ होती. माझी चावी काम करत नव्हती, कारण डबल लॉक होते.
- मी दार वाजवले, परंतु काहीच प्रतिसाद आला नाही. मी फोन, मेसेज केले.
- मी खाली उतरलो आणि कुलुप दुरुस्त करणा-या व्यक्तीकडून दुसरी चावी बनवण्याचा विचार करत होतो. त्यावेळी आमचा नोकर आला. मी त्याला बाल्कनीतून घराचे दार उघडण्यास सांगितले.
- घरात जाताच प्रत्युषा पंख्याला लटकलेली दिसली. मी धावत तिच्याकडे गेलो आणि तिच्या पायांना खांद्यावर ठेवले.
- कुलुप दुरुस्त करणा-या व्यक्तीने तिची ओढणी कापली. मी तिच्या चेह-यावर पाणी शिंपडले. तिच्या छातीला पम्प केले. तिच्यात श्वास भरण्यासाठी माऊथ-टू माऊथ प्रासेस केले.
- त्यानंतर मी लगेच तिला खाली घेऊन गेलो. मी कारमध्ये तिच्या शेजारीच बसलेलो होतो. तणावात आलो आणि सर्व सिग्नल तोडून रुग्णालयात पोहोचलो.
प्रत्युषाच्या प्रेग्नेंसीविषयी काय म्हणाला होता राहुल...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी राहुलला प्रत्युषाच्या गर्भपाताविषयी सविस्तर माहिती मागितली.
- राहुलने सांगितले, 'जेव्हा प्रत्युषाने सांगितले, की पीरियड्स मिस होताय, तेव्हा आम्ही प्रेग्नेंसी टेस्टसाठी डॉक्टरांकडे गेलो. त्यानंतर आम्ही गर्भपाताचा निर्णय घेतला. कारण आमचे लग्न झालेले नव्हते, आम्ही केवळ लिविंगमध्ये राहत होतो.'
- 'मी तिला गर्भपातासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. परंतु तिथे खूप उशीर झाल्याने तिने मला तिथून जाण्यास सांगितले.'
- मात्र, दुस-या दिवशी मी पुन्हा त्या डॉक्टरांकडे तिच्यासाठी औषधे आणण्यासाठी गेलो.
- आम्ही आमचे भविष्य लक्षात घेऊन गर्भपाताचा निर्णय घेतला होता, कारण आम्ही नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होतो.
- यादरम्यान पोलिस राहलुची DNA चाचणी करू शकतात.
पुढे वाचा, या प्रकरणाविषयी सविस्तर आणि आतापर्यंत काय-काय खुलासे झाले...