आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2016चे 10 मोठे सिनेमे, जाणून घ्या बॉक्स ऑफिसवर कुणाची कशी परिस्थिती असेल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रईस'च्या पोस्टरवर शाहरुख खान आणि 50व्या बर्थडे पार्टीदरम्यान सलमान खान - Divya Marathi
'रईस'च्या पोस्टरवर शाहरुख खान आणि 50व्या बर्थडे पार्टीदरम्यान सलमान खान
मुंबई- 2016मध्ये 'वजीर', 'एअरलिफ्ट', 'फॅन', 'रईस', 'मोहनजो दाडो', 'ए दिल है मुश्किल', 'रंगून', 'सुल्तान', 'जग्गा जासूस' आणि 'दंगल'सारखे बिग बजेट सिनेमे रिलीज होणार आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमांचा परफॉर्मन्स कसा असेल? हा जाणून घेण्यासाठी dainikbhaskar.comच्या ओमकार कुलकर्णी यांनी सेलिब्रिटीच्या न्यूमेरोलॉजिस्ट संजय जुमानी यांच्याशी बातचीत केली. चला जाणून घेऊया कोणत्या सिनेमाची काय स्थिती असेल...
सुल्तान
रिलीज डेट- ईद रिलीज (तारिख ठरलेली नाहीये)
स्टारकास्ट- सलमान खान

सलमान खानला 51वे वर्षे लागले आहे. 5+1= 6 आणि हे वर्ष 2016 चालू आहे. याचा अंक 9 (2+0+1+6) आहे. 3, 6 आणि 9 लकी नंबर असतात. अर्थातच 'सुल्तान' बॉक्स ऑफिवर जोरदार कमाई करणार आहे.
रईस
रिलीज डेट- 8 जुलै
स्टारकास्ट- शाहरुख खान

शाहरुख खानचा 'अशोका' 26 (2+6 =8) ऑक्टोबरला रिलीज झाला होता. तेव्हा सांगितले जात होते, की हा सिनेमा चांगला बिझनेस करणार नाही आणि असेच झाले. हा सिनेमा फ्लॉप झाला. 'रईस'च्या रिलीजचा अंकसुध्दा 8 आहे. त्यामुळे सिनेमाच्या टीमला सल्ला आहे, की हा सिनेमा 7 जुलैला रिलीज करावा, नाहीतर शाहरुखला अपयश पचवावे लागेल.
नोट: आतापर्यंतच्या बातम्यांनुसार 'सुल्तान' आणि 'रईस' एकत्र रिलीज होतील. जर असे झाले तर ही आतापर्यंतची सर्वात रंजक टक्कर असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 'फॅन', 'रईस', 'मोहनजो दाडो', 'ए दिल है मुश्किल', 'रंगून', 'सुल्तान', 'जग्गा जासूस' आणि 'दंगल'चे प्रीडिक्शन...
बातम्या आणखी आहेत...