आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोशूटमध्ये बेबी बंप दाखवताना दिसली करीना, प्रेग्नेंसीचा काळ असा करतेय एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष मल्होत्रासोबत करीना कपूर - Divya Marathi
मनीष मल्होत्रासोबत करीना कपूर
मुंबईः यावर्षी डिसेंबर महिन्यात आई होणारी करीना कपूर खान याकाळात लॅक्मे फॅशन वीकमध्ये कॅटवॉक करण्यापासून ते मॅगझिनच्या कव्हर पेजवर आपला जलवा दाखवताना दिसतेय. करीनाने तिचा बेस्ट फ्रेंड आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत अलीकडेच व्होग इंडियाशूटसाठी फोटोशूट केले. या फोटोजमध्ये करीनाच्या चेह-यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्ट दिसतोय. मनीष मल्होत्राने आपल्या ट्विटर अकाउंटवर हे फोटोज शेअर करुन लिहिले, “A day with my #favourite and the very#beautiful#Glowy#kareenakapoorkhan.

प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करतेय करीना...
करीनाचे हे सर्व फोटोज बघता ती आपला प्रेग्नेंसीचा काळ पुरेपुर एन्जॉय करत असल्याचे दिसून येतंय. करीना शेवटची उडता पंजाब या सिनेमात झळकली होती. आता ती आपल्या आगामी वीरे दी वेडिंग या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होती. या सिनेमात तिच्यासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. करीनाने अलीकडेच मुंबई आणखी एक अॅड शूटदेखील केले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे करीनाचे आणखी काही फोटोज..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...