आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहाचे बेबी शॉवर, पिंक साडीत खुलले सौंदर्य, इनस्टाग्रामवर धर्मांध यूझर्सने केले ट्रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोहा अली खान आणि तिचा नवरा कुमाल खेमू त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या कपलने त्यांचे बेबी शॉवर सेलिब्रेट केले. यावेळी सोहाने पिंक कलरची सिल्कची साडी नेसली होती. या साडीत ती फारच सुंदर दिसत होती. या कार्यक्रमाला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सोहाने काही फोटो सोशल मीडियावरही शेयर केले आहेत. एका फोटोत सोहा नवऱ्याबरोबर बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. इतर फोटोंमध्ये सोहा तिच्या कुटुंबीयांबरोबर दिसत आहे. 'इंटरनॅशल योगा डे'ला सोहाने प्रेग्नंसी टाइम योगा करतानाचे काही फोटो पोस्ट केले होते. काही दिवसांपूर्वीच सोहा आणि कुणाल लंडनमधून बेबीमून साजरा करून परतले आहेत. 
 
यूझर्सचे धार्मिक कमेंट..
सोहाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिने साडी परिधान केली आहे. त्यावरून तिला काही धर्मांध यूझर्सने ट्रोल केले आहे. फोटो पोस्ट केल्यानंतर ईदचा उल्लेखही केला नाही, असे एका यूझरने लिहिले. तर तिच्या साडीवरही काहींनी कमेंट केले. मुस्लीम असे नसतात, हे काय घातले आहे, आपल्या नावासमोरून नवाब  हटवून टाक अशा शब्दांत तिच्यावर टीकेच भडीमार करण्यात आला आहे. काही यूझर्सने सोहाच्या बाजुनेही कमेंट केल्या आहेत. 
 
पुढील स्लाइडस्वर पाहा सोहाचे आणखी काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...