आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीतीचे मोठ्या पडद्यावर पुनरागमनाचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रीतीने अॅक्ट्रेस, निर्माती आणि यशस्वी बिझनेस वुमन म्हणून नवीन कारकीर्दीला सुरुवात करणार असल्याचे म्हटले आहे. माझी प्रत्येक गोष्ट शिकायची इच्छा असल्याने मी अॅक्टिंग सोडून बिझनेसकडे वळले. यातून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या शिवाय आर्थिकदृष्ट्या मी अधिक सक्षम झाले. आता पुन्हा निर्मिती अभिनयामध्ये उतरून मला वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत.
दोन्ही गालांवरच्या खळ्या आणि मधाळ डोळे ही निसर्गत: मिळालेली देणगी असलेली प्रीती झिंटा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसमोर येत आहे. सध्या ती 'नच बलिए-७'या डान्स शोच्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. आता लवकरच ती चित्रपटामध्येदेखील पुनरागमन करणार आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हीरोज'नंतर तिचा २०१३ मध्ये 'इश्क इन पॅरिस' फ्लॉप ठरला. या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्नदेखील फसला. मागील काही दिवसांमध्ये ती आयपीएल टीममध्ये रमलेली दिसली. सध्या ती सनी देओलसोबत 'भैयाजी सुपरहिट'चे शूटिंग करत असून काही दिवसांतच चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल संपणार आहे. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातदेखील प्रीती झिंटा लवकरच सक्रिय होणार आहे.
प्रीतीने याबाबत बोलताना सांगितले की, 'सध्या मी काही मोठ्या चित्रपटांवर काम करत असून या वर्षाअखेरीस या सर्व चित्रपटांचे शूटिंग पूर्ण होईल. याचसोबत काही नवीन चित्रपटांवरदेखील काम करण्यास सुरुवात करणार आहे. या वर्षात टेक्निकली मी एंटरटेनमेंटच्या प्रत्येक क्षेत्रात सक्रिय झालेली असेल. माझ्याकडे काम करण्यासाठी आता पुरेसा वेळ मिळण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्यादेखील मी सक्षम आहे.'
निर्मिती संस्थेबाबत विचारले असता तिने सांगितले की, 'याबाबतच्या काही गोष्टींची मी लवकरच घोषणा करेन. सध्या माझे लक्ष केवळ डान्स शोवर असून तो हिट ठरला तरच टीव्हीमध्ये मी काम करत राहीन.' पुढे बोलताना तिने सांगितले की, 'माझ्या आयपीएल टीमसाठी यंदाचा सीझन लकी नाही, त्यामुळे टीव्ही शो हिट करण्याचा माझा प्रयत्न असेल.'
बातम्या आणखी आहेत...