आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BUZZ: 2016मध्ये प्रिती 10 वर्षे लहान अमेरिकन व्यक्तीसोबत चढणार बोहल्यावर?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेत्री गीता बसराने नुकताच क्रिकेटर हरभजन सिंहसोबत संसार थाटला आहे. त्यानंतर युवराज सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच यांच्याही लग्नाची बातमी आली. आता गीता आणि हेजलनंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटासुध्दा लग्न करणार असे वृत्त समोर आले होते. मात्र प्रितीने या बातम्यांचे खंडन केले आहे.
प्रिती 40 वर्षीय अमेरिकन उद्योगपती जीन गुडएनफसोबत लग्न बातमी समोर आली होती. प्रिती झिंटा आयपीएलमधील किंग पंजाब टीमची मालकिन आहे. तिचा भागीदार नेस वाडिया आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्रिती आणि नेस वाडियाचे सुत जुळल्याच्या बातम्या होत्या. मात्र दोघांचे काही कारणांनी जोरदार भांडण झाले आणि हे नाते संपुष्टात आले. प्रितीने नेसवर छेडछाड केल्याचा आरोप लावला होता.
प्रिती पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2016ला लग्नगाठीत अडकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र स्वत: प्रितीने या बातम्यांना अफवा असल्याचे सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी जीन आणि प्रितीची भेट एका ट्रिपदरम्यान झाली होती. आयपीएल 2014च्या सेमीफायनलमध्ये तो प्रितीसोबत दिसला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा प्रितीच्या यापूर्वीच्या अफेअर्सविषयी...