आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'प्रेम..\'ची पहिल्याच दिवशी 40 कोटींची कमाई, वाचा या वर्षीच्या Biggest Opener TOP10 Movie बद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या "प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींची कमाई करून यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूरची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट देशात ४ हजार ५०० चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. कौटुंबिक कथानक असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करेल, असा अंदाज चित्रपट जाणकारांनी वर्तवला आहे. याआधी सलमानने दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्यासोबत "मैने प्यार किया', "हम आपके हैं कौन' आणि "हम साथ साथ हैं' या चित्रपटांत काम केले होते. विशेष म्हणजे ही जोडी १६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्याच दिवशी 39 कोटी रुपये कमावले आहे. तर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 40.35 कोटी रुपये एवढा आहे. तरणने ट्वीट केले आहे की, "#PremRatanDhanPayo collects ₹ 40.35 cr on Day 1. Hindi version only... Tamil and Telugu biz being compiled... OUTSTANDING START!". हे आकडे पाहाता हा चित्रपट या वर्षीचा बिग्गेस्ट ओपनींग बॉलिवूड चित्रपट आहे.

नोट : शाहरुख खान स्टारर 'हॅप्पी न्यू ईयर' च्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन 36.31 कोटीला मागे टाकत 'प्रेम रतन धन पायो' पहिल्या दिवशी सर्वात जास्त पैसे कमावणारा चित्रपट बनला आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, या वर्षीच्या TOP 10 BIGGEST OPENING FILMS बद्दल