आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेश्येकडून राखी बांधून घ्यायचे सुनील दत्त, मुलीने सांगितला पूर्ण किस्सा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा माझ्या आईला कॅन्सरचे निदान झाले आणि ती रुग्णालयात दाखल होती, त्याकाळात माझे वडील पुर्णतः कोलमडून गेले होते. ते रोज रुग्णालयात चकरा मारत असायचे आणि आई बरी व्हावी यासाठी प्रत्येक देवाकडे साकडं घालायचे. आयुष्यात आलेला हा संघर्षाचा काळ माजी खासदार प्रिया दत्त यांनी शेअर केला. अलीकडे जयपूर येथील एका कार्यक्रमात प्रिया दत्त यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

 - प्रिया म्हणाल्या, वडिलांनी राजकारणात राहून अनेक समाजपयोगी कामे केली. पण तरीदेखील त्यांना अँटी नॅशनल संबोधले गेले होते, हे त्यांच्या आयुष्यातील एक मोठे दुःख होते.
- वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याचा मुद्दा प्रिया दत्तने मांडला आहे. यामागे एक मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. माझे वडील दर रक्षाबंधनाला वेश्या व्यवसाय करणा-या महिलांकडून राखी बांधून घेत होते.  
- जेव्हा मी या महिलांसाठी काम करत होते, तेव्हा एक ब्लॉगर त्यांची मुलाखत घेण्यासाठी आली होती. तेव्हा मी तिला पत्रकारिता का करतेय, असा प्रश्न विचारला होता. यावर तिने उत्तर दिले, मी हे काम पोटापाण्यासाठी करतेय.  
- माझ्या वडिलांनी नेहमीच आम्हाला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे कुठलीही गोष्ट सहज जज करु नका. सर्वप्रथम त्यामागची परिस्थिती समजून घ्या.  

 आईच्या निधनानंतर कोसळले होते वडील... 
- प्रिया दत्त म्हणाल्या, आयुष्याकडून खूप धडे मिळत असतात. आयुष्य चेहरा आणि वेळ बदलून बरंच काही शिकवत असतं.  
- माझ्या आईवर परदेशात उपचार सुरु असताना आम्ही तिन्ही बहीणभावंड वर्षभरासाठी अभ्यास सोडून तिच्यासाठी न्यूयॉर्कला शिफ्ट झालो होतो. आईच्या निधनानंतर माझे वडील पुर्णतः कोलमडून गेले होते.  
- ते तासन्तास गच्चीवर एकटे बसून राहायचे.
- एकेदिवशी मी गच्चीवर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आई कुठेही गेली नाही. ती चांदण्यांमधून आपल्याला बघतेय.
- काही काळ गेल्यानंतर वडिलांनी स्वतःला सावरले आणि सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.  

पुढील स्लाईड्सवर बघा, दत्त कुटुंबीयांचे फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...