आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Celebrates Diwali With Mom In Montreal

प्रियांकाने भारतात नव्हे, कॅनडात पारंपरिक पद्धतीने साजरी केली दिवाळी, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई मधूसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा - Divya Marathi
आई मधूसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा

'क्वांटिको' या अमेरिकन टीव्ही शोच्या शूटिंगमध्ये बिझी असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या कुटुबांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. प्रियांका शूटिंगच्या निमित्ताने सध्या कॅनडातील मॉन्ट्रियाल येथे आहे. त्यामुळे प्रियाकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तिची आई मधू चोप्रा या मॉन्ट्रियाल येथे पोहोचल्या होत्या.
दिवाळीच्या निमित्ताने प्रियांकाने संपूर्ण घराला रोशनाई केली होती. फोटोजमध्ये ती वाइट-रेड कलरच्या पटियाला सूटमध्ये दिसतेय. या सेलिब्रेशनमध्ये प्रियांकाचे 'क्वांटिको' या मालिकेतील तिचे को-स्टार जोहाना ब्रॅडी, एनाबेल एसोटा आणि यास्मील अल मसारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार इंडियन ट्रेडिशन ड्रेसेसमध्ये दिसले.
प्रियांकाने फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. शिवाय दारासमोर सुंदर रांगोळीसुद्धा रेखाटली. या दिवाळी सेलिब्रेशनची छायाचित्रे प्रियांकाने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.
तुम्हीही पाहा, परदेशात प्रियांकाने कसे केले दिवाळी सेलिब्रेशन...