आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेवॉच'वर सेंसर बोर्डाची कात्री, स्वतः प्रियांका म्हणतेय लहान मुलांसाठी नाही चित्रपट..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बेवॉच'चे पोस्टर - Divya Marathi
'बेवॉच'चे पोस्टर
मुंबई -  अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिचा पहिला हॉलीवूड चित्रपट बेवॉच मधून डेब्यू करत आहे. चित्रपटाला CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने 'ए' सर्टीफिकेट दिले आहे. याचे कारण चित्रपटातील बिकीनी सीन्स नाही तर संवाद आहे. सेंसर बोर्डाने चित्रपटातील पाच सीन्स, एक विजुअल आणि 4 वर्बल सीन कट केले आहेत.
 
2 जून रोजी भारतात रिलीज होणाऱ्या 'बेवॉच' चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत ड्वेन जॉनसन आणि जैक एफ्रॉन लीड रोलमध्ये आहेत. CBFC चीफ पहलाज निहलानी यांनी सांगितले, की बिकीनी सीन्समुळे कोणताच सीन कट केला नाही. 
 
90 च्या दशकात एका टी.व्ही शो वरुन 'बेवॉच' चित्रपट बनविण्यात आला आहे. भारतात हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी CBFC चीफ पहलाज निहलानी यांनी चित्रपटाला 'ए' सर्टीफिकेट दिले आहे. यावेळी पहलाज निहलानी म्हटले,  'भारतात बिकीनी सीनवरुन जास्त चर्चेची  काही गरज नाही. गोवा येथील कोणत्याही बीचवर गेलात तरी तिथे अनेक स्त्रिया बिकीनीवर दिसतात. या प्रकारच्या सीनमुळे कोणताही सीन आम्ही कट केला नाही. '
 
पुढच्या 2 स्लाईडवर वाचा, अजून काय म्हटले पहलाज निहलानी..
बातम्या आणखी आहेत...