मुंबई: 'कुणासाठी स्वत:चा जीव देण्यात काय अर्थ आहे? मी तर माझा जीव देण्याआधी समोरच्याचा जीव घेईल' असे म्हणणे आहे अभिनेत्री प्रियांका चोप्राचे. पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी भारतात आलेल्या प्रियांकाने असे सांगून एक्स-सेक्रेटरी प्रकाश जाजूच्या आत्महत्येच्या वक्तव्याला स्पष्टपणे नाकारले आहे. प्रकाश जाजू म्हणाले होते, 'संघर्षाच्या काळात प्रियांकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मी तिला अडकवले आणि वाचवले.'
काय होते प्रकरण?
- टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्याचे दोन-तीन दिवसांनी माजी-सेक्रेटरी प्रकाश जाजूने दावा केला होता, की प्रियांकाने 2002मध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा
प्रियांका बॉलिवूडमध्ये नवीन होती आणि स्ट्रगल करत होती.
- जाजूच्या दाव्यानुसार, ती बॉयफ्रेंड असीम मर्चेंटच्या आईच्या निधनाने दु:खी होती आणि तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेली जाजूनेच तिला वाचवले होते.
- जाजूच्या दाव्याला सर्वात पहिले प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी खोटे असल्याचे सांगितले होते.
माध्यमांच्या वागणूकीने दु:खी आहे प्रियांका...
- प्रियांका म्हणाली, 'हे खोटे आहे. ज्या व्यक्तीने मला त्रास दिला, माझा छळ केला त्या व्यक्तीला भारतीय माध्यमे महत्व देत आहेत. याचे मला दु:ख झाले आहे. त्याचा इतिहास माहित न करता त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. म्हणून मी आता माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच उरले नाहीये. मीडिया अशा व्यक्तीचे म्हणणे ऐकतेय, ज्याचे काहीच महत्व नाहीये.'
प्रियांका पुढे म्हणाली, 'जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण घरात मारहाण आणि छळ सहन करणा-या महिलांविषयी का बोलत नाहीत. किंवा ज्या महिला स्वत: घरात आनंदी नसतात. ग्लॅमर इंडस्ट्रीवर बोट उचलणे सोपे आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या प्रत्युषाच्या आत्महत्येविषयी काय म्हणाली प्रियांका...