आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या \'खास\' कारणांमुळे प्रियंका चोप्रा 5व्यांदा ठरली आशियातील सर्वात सेक्सी वूमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंका चोप्रा. - Divya Marathi
प्रियंका चोप्रा.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रत्येक दिवशी यशाचे नवे शिखर सर करत आहे, आता तिने  2017 ची आशियातील सर्वात सेक्सी महिला असल्याचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे तिला हा किताब काही प्रथमच मिळालेला नाही तर, प्रियंका पाचव्यांदा आशियातील सर्वात सेक्सी महिला ठरली आहे. लंडन येथील नियतकालिक इस्टर्न आयने नुकतेच 2017 मधील 50 सेक्सी महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात प्रियंका टॉपवर आहे. 

 

दीपिकाचे स्थान बळकावले... 
यावेळी प्रियंकाची स्पर्धा दीपिका पदुकोनसोबत झाली होती. गेल्यावर्षी दीपिका सेक्स सिंबॉल ठरली होती. प्रियंकाने दीपिकाला मागे टाकत हा किताब मिळवला आहे. 

 

दीपिका तिसऱ्या तर आलिया भट्ट चौथ्या क्रमांकवर... 
- सेक्सी वूमनच्या यादीत दीपिका पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर खाली घसरली आहे. तर, टीव्ही अॅक्ट्रेस निया शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर आशियातील सेक्सी वूमनच्या लिस्टमध्ये आलिया भट्ट, पाकिस्तानी अॅक्ट्रेस माहिरा खान आणि टीव्ही अॅक्ट्रेस दृष्टी धामी यांचा देखील समावेश झाला आहे. 
- आलिया भट्ट चौथ्या स्थानवर विराजमान झाली आहे. तर पाचवा क्रमांक पाकिस्तानी अॅक्ट्रेस माहिरा खानने पटकावला आहे. दृष्टी सहाव्या क्रमांकावर आहे.

 

प्रियंकाने ट्विट करुन यांचे मानले आभार... 
- प्रियंका पाचव्यांदा आशियातील सर्वात सेक्सी वूमन निवडली गेल्यानंतर अतिशय आनंदी आहे. तिने ट्विट करुन या पुरस्कारासाठी आई-वडिलांना धन्यवाद दिले. तिने म्हटले आहे, की हे फक्त जिन्सचा (गुणसूत्र) परिणाम नाही तर त्यांच्या प्रेमामुळे मला 5व्यांदा सेक्सी वूमनचा किताब मिळाला आहे. 

 

या 4 कारणांमुळे प्रियंका 5व्यांदा ठरली सेक्सी वूमन 
1- सरते वर्ष 2017 प्रियंकासाठी स्पेशल राहिले आहे. यावर्षी तिने हॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिची हॉलिवूड डेब्यू फिल्म 'बेवॉच' रिलीज झाली आहे. यामधील तिचा परफॉर्मन्स सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. या फिल्ममुळे प्रियंका जगभरात ओळखली जाऊ लागली आहे. 
2- त्यासोबतच अमेरिकन टीव्ही सीरिज क्वांटिकोसाठी प्रियंकाला यावर्षी  People's Choice Award मिळाला.
3- प्रियंकाने हॉलिवूड डेब्यू आणि अमेरिकन टीव्ही सीरिजसोबत हॉलिवूडचे अनेक बडे प्रोजेक्ट्स साइन केले आहेत. यामुळे ती लाइमलाइटमध्ये असून कायम चर्चेत आहे. यामध्ये  'Kid Like Jake' आणि 'Isn’t It Romantic?' यांचा समावेश आहे. 
4- यासर्वांसोबत मेट गालापासून अॅकेडमी अवॉर्ड्स, एमी अवॉर्ड्सपर्यंत प्रियंका चोप्राने आपला ठसा उमटवला आहे. तिच्या स्टाइल स्टेटमेंटने सर्वांनाच वेड लावले आहे. यावर्षभरात प्रियंकाच्या प्रसिद्धीत दिवसेंदिवस भर पडत गेली आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रियंकाचे ट्विट आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...