आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Shooting \'Gangaajal 2\' In Bhopal

शूटिंगसाठी भोपाळमध्ये पोहोचली PC, म्हणाली - \'दमदार पटकथेमुळे निवडला सिनेमा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री प्रियांका चोप्रा)
भोपाळः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी भोपाळमध्ये दाखल झाली आहे. तिच्या या आगामी सिनेमाचे नाव आहे 'गंगाजल 2'. प्रकाश झा आणि राहुल भट यांनी यापूर्वी सिनेमाच्या काही भागांचे शूटिंग पूर्ण केले. आता पुढल्या शूटिंगसाठी प्रियांका मंगळवारी भोपाळमध्ये पोहोचली. शूटिंगच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच येथे आली आहे.
दमदार पटकथेमुळे निवडला सिनेमा
सिनेमाविषयी बोलताना प्रियांका म्हणाली, "गंगाजल 2 मध्ये मी एसपीची भूमिका साकारत आहे. युनिफॉर्म असलेल्या रोल आता माझ्यासाठी फॅमिलिअर झाले आहेत. प्रकाश झा अमेजिंग फिल्ममेकर आहेत. आम्ही दोघेही दीर्घकाळापासून एकत्र काम करण्याची वाट बघत होतो. ही संधी आता मिळाली आहे. पोलिस ऑफिसरची भूमिका असलेला हा माझा तिसरा सिनेमा आहे. यामध्ये मी आयपीएस ऑफिसरची भूमिका वठवत आहे. यापूर्वी 'डॉन' आणि 'गुंडे'मध्ये मी कॉपचे रोल केले आहेत."
आगामी सिनेमांविषयी प्रियांका म्हणाली, "बाजीराव मस्तानी हा माझा आगामी सिनेमा आहे. यामध्ये मी पेशवेंच्या मुलीच्या भूमिकात आहेत. त्यानंतर 'गंगाजल 2' हा सिनेमा येईल. शिवाय एक टीव्ही शोसुद्धा येणारेय. आता सध्या खूप काम आहे. त्यामुळे दुस-या प्रोजेक्टसाठी वेळ नाहीये."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा भोपाळ येथे पोहोचलेल्या प्रियांकाची खास छायाचित्रे...