टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिलला आत्महत्या केली. प्रत्युषा काही दिवसांपासून तणावात होती आणि तिचे बॉयफ्रेंडसोबत भांडणसुध्दा झाले होते. त्यामुळे तिने मृत्यूला जवळ केले, असे सांगितले जात आहे. ग्लॅमर वर्ल्डमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अभिनेत्री पैसा आणि प्रसिध्दी मागे धावू लागतात. मात्र त्यांना यशोशिखरापर्यंत पोहचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अनेकदा तणवात जातात. अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतसुध्दा असेच काहीसे घडले आहे.
प्रियांकानेसुध्दा संघर्षाच्या काळात दोन-तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. असा खुलासा तिचे एक्स-मॅनेजर प्रकाश जाजू यांनी केला आहे. प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमिवर त्यांनी केलेल्या टि्वटमध्ये असा खुलासा केला. त्यांनी टि्वट करून सांगितले, 'प्रियांका आता कठोर मनाची दिसत असली तरी संघर्षाच्या काळात ती कमकुवत होती. तिने दोन ते तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. परंतु त्यावेळी मी तिला थांबवले होते.'
प्रियांकाच्या एक्स-बॉयफ्रेंडविषयीसुध्दा केला दावा...
- फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणा-या तरुणींची परिस्थिती जाजू यांनी एका पाठोपाठ अनेक टि्वट करून सांगितली.
- यादरम्यान त्यांनी सांगितले, प्रियांका कथित बॉयफ्रेंड असीम मर्चेंटसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. तेव्हा प्रियांका मला रात्री फोन करायची आणि खूप रडायची.
- प्रकाश यांनी टि्वट केली, 'रोज पीसी आणि असीममध्ये भांडण व्हायचे. रात्री 2-2, 3-3 वाजता रडून मला फोन करायची आणि मी तिला शांत करत होतो.'
- एकदा मॅडम, असीमसोबत भांडण करून आत्महत्या करण्यासाठी कार घेऊन वसईला गेली होती. मी मोठ्या प्रयत्नाने तिला समजावले आणि परत आणले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा प्रकाश जाजू यांचे टि्वट्स...