आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra’S Ex Secretary Prakash Jaju Tweeted Against Her

प्रियांकावर भडकला माजी सेक्रेटरी, वडिलांवरसुध्दा लावले गंभीर आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा माजी सेक्रेटरी प्रकाश जाजू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने प्रियांकाविषयी वादग्रस्त टि्वट करून चर्चा एकवटली आहे. त्याने स्वत: योग्य ठरवून प्रियांका आणि तिच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप लावले आहेत. प्रियांकाचे दिवंगत वडील आकाश चोप्रा यांना गुन्हेगारी वृत्तीचे सांगितले आहे. प्रकाशचे म्हणणे आहे, की ज्या मॅसेजमुळे प्रकाशला तुरुंगात जावे लागले, ते प्रियांकाच्या वडिलांनीच त्याच्या मोबाईलमध्ये टाकले होते. 
 
2008मध्ये जावे लागले तुरुंगात- 
2008मध्ये प्रकाशने प्रियांकावर थकबाकी न दिल्याला आरोप लावला होता. त्यानंतर प्रियांकाच्या वडिलांनी त्याच्यावर मुलीच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप लावला. त्यानंतर प्रकाशला 67 दिवसांचा तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रियांकाचा एक्स-बॉयफ्रेंड असीम मर्चेंटला भेटला. दोघांनी \'67 डेज\' नावाचा सिनेमा तयार करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकाश जाजूच्या आयुष्यावर आधारित होता. मात्र आपल्याला या सिनेमात चूकीच्या पध्दतीने दाखवण्यात येऊ शकते हे प्रियांकाच्या लक्षात आले. तिने असीमला एक कायदेशीर नोटीस पाठवून सिनेमा डबाबंद करण्यास सांगितले. प्रियांकाने 2004मध्ये प्रकाशसोबत कॉन्ट्रॅक्ट संपवला होता.
 
17पेक्षा जास्त Tweets करून साधला निशाणा- 
प्रकाशने प्रियांकाबाबत 17पेक्षा जास्त Tweets केले आहेत. त्यामध्ये त्याने कसाप्रकारे प्रियांकाची मदत केली. या Tweetsमध्ये त्याने केवळ प्रियांकावरच नव्हे तर तिचे दिवंगत वडील आकाश चोप्रा यांच्यावरसुध्दा आरोप लावले. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, प्रकाश जाजूचे Tweets, यामध्ये प्रियांका आणि तिच्या वडिलांवर आरोप लावण्यात आला आहे...