आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्सचा मुलांच्या जगात प्रवेश, तीन बाल चित्रपटांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्सने आता लहान मुलांच्या दुनियेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका आता बाल चित्रपटांची निर्मिती करणार आहे. यावर्षी पर्पल पेबल पिक्चर्सचे सिक्कीम, कोकणी आणि हिंदी अशा तीन भाषांत तीन बाल चित्रपट रिलीज होतील. या सिनेमांची घोषणा करताना प्रियांका म्हणते, "लहान मुलांच्या अद्भूत दुनियेची सफर घडवणारे आजपर्यंत फार कमी सिनेमे बनले आहेत. आता या दुनियेत आम्ही पाऊल ठेवत आहोत. हे असे एक जग आहे, जिथे प्रेम, साधेपणा आणि निरागसता बघायला मिळते. या धाटणीचे सिनेमे आम्ही बनवत असल्याने मी खूप उत्साहित आहे आणि याचा आनंददेखील होतोय. आपल्या देशात अद्भूत कथांचा खजिना आहे. त्याविषयी ऐकत आपण मोठे झालो आहोत. विविध भाषांमध्ये या कथा असून ज्या आपल्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे.“  

विशेष म्हणजे प्रियांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार होत असलेले हे सर्व सिनेमे महिला दिग्दर्शक दिग्दर्शित करणार आहेत. याविषयी प्रियांका सांगते, "या प्रतिभावंत महिलांसोबत काम करण्याचा निश्चितच समृद्ध अनुभव आहे. त्या आपल्या जादुई अंदाजाने जणू दुस-याच जगात आपल्या घेऊन जातात. या महिला टीमसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.“
 
पर्पल पेबल पिक्चर्सचे 2017 मध्ये रिलीज होणारे तीन सिनेमे:

 सिनेमा - पहुना (सिक्किमी)
- लेखन आणि दिग्दर्शन – पाखी टायरवाला
- पहिला सिक्कीमी सिनेमा
कथाः माओवाद्यांच्या आंदोलनादरम्यान नेपाळच्या सिक्कीम भागात तीन नेपाळी मुले त्यांच्या आईवडिलांपासून वेगळे होतात. या तीन मुलांच्या प्रेम, ताकद आणि साहसाची ही कथा आहे.  
 
 सिनेमा -लिटील जो, कहाँ हो ? (कोकणी आणि हिंदी)
- लेखन आणि दिग्दर्शक – सुवर्णा नसनोडकर
कथाः प्रसिध्द कार्टूनिस्ट आर के लक्ष्मण आणि मारियो मिरांडा आणि त्यांच्या कार्टून्सच्या सुंदर जगाला ‘लिटील जो कहा हो’ हा सिनेमा एक श्रद्धांजली असेल. ही एक हलकी फुलकी मजेशीर कथा आहे. गोव्यात सिनेमाचे शूटिंग होणारेय.  
 
सिनेमा - अलमसर (वर्किंग टायटल) (हिंदी)
- लेखन आणि दिग्दर्शन – लॉरा मिश्रा
कथाः प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहलच्या पार्श्वभूमीवर सिनेमाचे कथानक आधारित आहे. या सिनेमात एक मुलगा आणि श्वानाची मैत्री आणि प्रेमाची कथा आहे.  
बातम्या आणखी आहेत...