आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indira Gandhi In A Purple Sari At The 1966 At US Visit, Priyanka, Wearing The Same Sari

बिग बींच्या पुतणीच्या रिसेप्शनला आजीच्या 50 वर्षे जुन्या साडीत दिसल्या प्रियांका गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकेत जांभळ्या रंगाच्या साडीत इंदिर गांधी (डावीकडे), उजवीकडे - कुणाल-नैना बच्चनच्या रिसेप्शनमध्ये पती रॉबर्ट वढेरासोबत तीच साडी परिधान करुन पोहोचलेल्या प्रियांका गांधी)
नवी दिल्ली - अलीकडेच दिल्लीत बिग बींची पुतणी नैना बच्चन आणि अभिनेता कुणाल कपूर यांचे वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या पार्टीत बॉलिवूडसोबतच राजकारणातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका गांधी या पती रॉबर्ट वढेरांसोबत नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्या होत्या.

प्रियांका गांधींनी परिधान केलेल्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचे कारण म्हणजे, प्रियांका यांनी त्यांच्या आजी आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जवळजवळ 50 वर्षे जुनी साडी परिधान केली होती. खरं तर प्रियांका पहिल्यांदाच आपल्या आजीच्या साडीत दिसल्या नाहीत. यापूर्वीही अनेकदा त्यांनी इंदिरा गांधींच्या साडी परिधान केल्या आहेत.
इंदिरा गांधी यांनी 1966 मध्ये अमेरिकेच्या दौ-यावर असताना ही साडी परिधान केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती लँडन बी जॉनसन यांनी आयोजित केलेल्या डिनरवेळी इंदिरा गांधी या साडीत दिसल्या होत्या. प्रियांका यांनी आपल्या आजीप्रमाणेच पर्ल इयरिंग घातले होते.
नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यानंतर प्रियांका यांनी पाहुण्यांसोबत फोटो काढून घेतले. थोडा वेळ थांबून त्या तेथून निघून गेल्या. या पार्टीत अभिषेक, ऐश्वर्या, श्वेता बच्चन आणि हृतिक रोशन यांनी ताल धरला होता.
अमिताभ यांच्या आई तेजी बच्चन यांच्याकडून प्रियांका गांधींनी गिरवले होते हिंदीचे धडे...
टेलिग्राफ या इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, गांधी आणि बच्चन कुटुंबीयांचे जुने संबंध आहेत. प्रियांका यांनी बिग बींच्या आई तेजी बच्चन यांच्याकडून हिंदीचे धडे गिरवले होते.
31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर तेजी बच्चन यांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांना शाळेतून काढून स्वतःकडे ठेवले होते. इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा राजीव गांधी पश्चिम बंगालमध्ये दौ-यावर होते. सोनिया गांधींनी इंदिरा गांधी यांना रुग्णायलात आणले होते.
सात दशकांपासून बच्चन-गांधी घराण्यात मैत्रीचे संबंध
बच्चन आणि गांधी घराण्यात गेल्या सात दशकांपासून मैत्रीचे संबध आहेत. सरोजिनी नायडू यांनी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांची भेट नेहरु आणि इंदिरा यांच्याशी करुन घालून दिली होती. मात्र, बोफोर्स घोटाळ्यातील वादानंतर अमिताभ बच्चन यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बच्चन आणि गांधी कुटुंबीयात कटुता निर्माण झाली होती. मे 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर अमिताभ आणि जया बच्चन गांधी कुटुंबापासून दुरावले.
दोन्ही कुटुंबाला ओळखणा-या लोकांच्या मते, अमिताभ बच्चन गांधी घराण्यापासून दूरावे असले, तरीदेखील त्यांचे भाऊ अजिताभ आजही काँग्रेस आणि गांधी कुटुंबाच्या संपर्कात आहेत. अजिताभ यांच्या मैत्रीच्या संबंधामुळेच प्रियांका गांधी त्यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाल्या होत्या. अभिषेक आणि श्वेता बच्चन यांच्या लग्नात गांधी कुटुंबातून कुणीही सहभागी झाले नव्हते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा नैना-कुणालची भेट घेतानाची प्रियांका गांधी यांची छायाचित्रे...