आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चाेप्राच्या भावासह दाेघांवर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चाेप्रा हिच्या भावाच्या मालकीच्या काेरेगाव पार्क येथील ‘द मगशाॅट लाउंज’ या हाॅटेलवर पाेलिसांनी छापा टाकून १६ हुक्कांसह एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अाहे.

याप्रकरणी हाॅटेल मालक सिद्धार्थ अशाेक चाेप्रा (२६, रा. मुंबई) व हाॅटेलचा मॅनेजर प्रकाश तुलसाराम चाैधरी (२४, रा. पुणे) यांच्यावर काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ कलम ४ व २१ प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात अाली अाहे. सदर हाॅटेलमध्ये बंदी धुडकावून तंबाखूमिश्रीत हुक्का पार्लर सुरू हाेते. याची माहिती मिळताच पाेलिसांनी छापा टाकून कारवाई केली. गुन्हे शाखेच्या खंडणीविराेधी पथकाचे प्रभारी पाेलिस िनरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पाेलिस िनरीक्षक विठ्ठल कदम यांच्या पथकाने सदर कारवाई केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...