आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB EXCLUSIVE: ओम पुरीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नीने फ्रीज केले बँक अकाऊंट्स, वाचा 6 खुलासे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओम पुरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. - Divya Marathi
ओम पुरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई - ओम पुरी यांचा मृत्यूनंतर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या डोक्यात जखम असल्याचे आढळून आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. शनिवारी ओम पुरी यांचे ड्रायव्हर राम प्रमोद मिश्रा आणि प्रोड्यूसर खालिद किडवई यांना समोरा-समोर बसवून तीन तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी अभिनेते ओम यांची दुसरी पत्नी नंदिता पुरी यांनाही चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्या आल्या नाही. दुसरीकडे, नंदिता यांनी ओम पुरी यांचे सर्व बँक अकाऊंट्स फ्रीज केले आहे. पोलिस सुत्रांनी Dainikbhaskar.com ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अजून नंदिता यांना संशियत मानलेले नाही, मात्र त्यांना याबाबत माहिती द्यायची होती. 
   
फ्लॅटमध्ये न्यूड अवस्थेत मिळाली होती बॉडी, ग्लास भवती पोलिसांचा तपास सुरु 
- अभिनेते ओम पुरी शुक्रवारी सकाळी त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते. ते 66 वर्षांचे होते. 
- पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या डोक्यात दीड इंचाची खोलवर जखम आणि 4 सेंटीमीटर लांब निशाण असल्याचे आढळून आले होते. 
- गुरुवार रात्री 1.30 ते 2.20 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ओमपुरी रात्री 1 वाजता घरी पोहोचले होते.
- ओमपुरी शेवटचे प्रोड्यूसर खालिद आणि ड्रायव्हर सोबत होते. त्यामुळे त्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. खालिद यांच्याकडे शुक्रवारीही दोन तास चौकशी केली गेली होती. 
शनिवारच्या पोलिस चौकशीत झाले 6 खुलासे 

#1 - ग्लास बदलला होता
- पोलिस सुत्रांनी Dainikbhaskar.com ला दिलेल्या माहितीनुसार, ओम पुरी ज्या ग्लासमध्ये दारु पित होते तो नंदितासोबतच्या भांडणादरम्यान  बदलला गेला होता.
- प्रोड्यूसर खालिद यांनी पोलिसांना सांगितले, की ओम पुरी जेव्हा नंदिता यांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या हातात स्टीलचा ग्लास होता. ते परत आले तेव्हा त्यांच्या हातात काचेचा ग्लास होता आणि दारुही बदलली होती.
- पोलिसांनी सांगितले, की बिल्डिंगच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही ग्लास बदलला असल्याला दुजोरा मिळाला आहे. याशिवाय तेथे असलेल्या गार्डनेही ओम पुरी यांच्या हातात आधी स्टीलचा ग्लास असल्याचे म्हटले. 
 
#2 नंदिता यांनी अकाऊंट्स फ्रिज केले 
- पोलिसांनी सांगितले, की नंदिता यांनी कोणतीही सूचना न देता ओम पुरी यांचे तीन बँक अकाऊंट्स फ्रीज केले आहे. यामुळे त्यांच्या स्टाफची सॅलरी थांबली आहे. नंदिता यांनी स्टाफला पगार देण्यास नकार दिला आहे.
 
#3 सर्व प्रोड्यूसरर्सला सांगितले- ओमची फिस जमा करा
- नंदिता यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर  ओम पुरी यांचे ज्यांच्यासोबत काम सुरु होते त्या सर्व प्रोड्यूसरर्सला त्यांची फिस लवकरात लवकर जमा करण्यास सांगितले आहे. 
 
#4 बंगल्यावरही गेल्या होत्या नंदिता 
- ओम पुरी यांच्या मृत्यूनंतर नंदिता पोलिसांना न सांगता खंडाळा येथील त्यांच्या बंगल्यावर गेल्या होत्या. त्याच्या चाव्या त्यांनी ताब्यात घेतल्या आहे. याशिवाय ओम यांच्या फ्लॅटवरही गेल्या होत्या.
 
#5 नंदिताने ओम यांच्या पहिल्या पत्नीला फोन करुन सांगितले- अंत्यसंस्काराला येऊ नको
- नंदिता यांनी ओम यांची पहिली पत्नी सीमा कपूर यांना फोन करुन त्यांच्या अंत्यसंस्काराला येऊ नको असे बजावले होते. ओम यांच्या मृत्यूनंतर शुक्रवारी दुपारी 1 वाजता त्यांनी सीमा यांना फोन केला होता.  वास्तविक सीमा कपूर यांनी पोलिसांकडे मदत मागितली होती. अभिनेत्री शबना आझमी यांनी सीमा यांना ओम यांचे अखेरचे दर्शन करविले. 
 
#6 शेवटचे आठ दिवस पहिल्या पत्नीसोबत बोलत होते ओम पुरी 
- ओम पुरी 8 दिवसांपासून पहिली पत्नी सीमाच्या संपर्कात होते. त्या दोघांमध्ये बोलणे होत होते. त्यांनी सीमा यांना मेसेज केला होता, 'तुम मेरा प्यार हो, लेकिन ईशान मेरी जान', ईशान हा ओम पुरी यांचा नंदितापासूनचा मुलगा आहे. 
   
 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)