आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pulkit And Shweta Denied The Reports Of Trouble In Their Marriage!

घटस्फोटाच्या बातम्या निव्वळ अफवा, सलमानच्या बहीणीने शेअर केला पतीसोबतचा Selfie

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्वेताने पती पुलकितसोबत घेतलेला हा Selfie टि्वटरवर शेअर केला आहे.)
मुंबई- मागील आठवड्यात बातमी आली होती, की अभिनेता पुलकित सम्राट आणि त्याची पत्नी श्वेता रोहिरा यांच्या खटके उडायला लागले होते. याची तक्रार शेजारी राहणारे लोकही करायला लागले होते, इतकेच नव्हे तर ऐकिवात होते, की पुलकित आणि श्वेता यांचा लवकरच घटस्फोट होणार आहे. मात्र पुलकित आणि श्वेताने या बातम्यांवर पूर्णविराम लावला आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी आपल्या नात्यात आलेली दरार आणि घटस्फोटाच्या बातम्यांना अफवा असल्याचे सांगितेल आहे. त्यांनी सांगितेल, की अफवांवर विश्वास ठेऊ नका, 3 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, त्याच्या शुभेच्छा द्या.
एकत्र साजरा केला करवा चौथ-
सूत्रांच्या सांगण्यानुसार, काही आठवड्यांपूर्वी श्वेता आणि पुलकितला वांद्रा स्थित एका कॉफी शॉपमध्ये पाहिल्या गेले होते. इतकेच नव्हे तर 30 ऑक्टोबरला त्यांना एकत्र करवा चौथ साजरा केला. श्वेताने पुलकितसोबतचा एका सेल्फीसुध्दा टि्वटरवर शेअर केला आहे. या सेल्फीखाली तिने लिहिले, 'From karwachaut to wedding month'
सलमानची मानलेली बहीण आहे श्वेता-
पुलकित सम्राटने सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिराचे लग्न 3 नोव्हेंबर 2014ला गोव्यात झाले होते. स्वत: सलमानने श्वेताचे कन्यादान केले होते. यादरम्यान सलमानचा भाऊ अरबाज आणि भावोजी अतुल अग्निहोत्रीसुध्दा लग्नात उपस्थित होते. श्वेता मुंबईची एक सिधी गर्ल आहे आणि बालपणापासून ती सलमानची चाहती आहे. एकेदिवशी ती सलमानच्या घरी पोहोचली आणि आईला म्हणाली मला सलमानला राखी बांधायची आहे. सलमानने लगेच होकार दिला आणि तेव्हापासून सलमान श्वेताचा भाऊ झाला. सलमान श्वेतावर सख्या बहिणीप्रमाणेच प्रेम करतो.
पुलकितने केलेय 'फुकरे' आणि 'ओ तेरी'मध्ये काम
पुलकित सम्राट दिल्लीचा रहिवासी आहे. त्याला सर्वात पहिले 'क्योकी सास भी कभी बहू थी' मालिकेत पाहिल्या गेले होते. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक मृगदीप सिंह लांबाच्या 'फुकरे' (2013) आणि उमेश बिष्टच्या 'ओ तेरी' (2014)मध्ये दिसला होता. 'ओ तेरी' सलमानचा भावोजी अतुल अग्निहोत्रीने निर्मित केला होता. यावर्षी त्याने 'बँगिस्तान' सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.
कसे जुळले श्वेता आणि पुलकितचे सुत-
पुलकित एकता कपूरच्या 'क्योकी सास भी कभी बहू थी' मालिकेत काम करत होता. त्यादरम्यान श्वेता एक ट्रेनी जर्नालिस्ट होती. त्यावेळी दोघांची भेट झाली आणि या भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झाले. दोघांनी साखरपुडा केला. पुलकित श्वेताला लग्नापूर्वीच मिसेस सम्राट म्हणत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पुलकित आणि श्वेताचे निवडक फोटो...