आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमन कॉन्ट्राव्हर्सी: सलमानच्या समर्थनार्थ बोलला मानलेल्या बहिणीचा पती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पुलकित सम्राट आणि सलमान खान)
मुंबई- अलीकडेच सुपरस्टार सलमान खान वादग्रस्त वक्तव्य करून वादात अडकला होता. त्याने 1993मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला दिल्या जाणा-या फाशीच्या विरोधात वक्तव्य केले होते. मात्र नंतर वडील सलीम खान यांच्या सांगण्यावरून त्याने माफीदेखील मागितली होती. तरीदेखील सलमान हिंदुत्व संघटनांच्या निशाण्यावर आहे. आता बातमी अशी आहे, की अभिनेता पुलकित सम्राट सलमानच्या समर्थनासाठी पुढे सरसावला आहे. पुलकितच्या सांगण्यानुसार, सलमानच्या टि्वटला चुकीच्या अर्थाने घेतले आहे. तो म्हणाला, 'सलमानने आपले म्हणणे मांडले होते, परंतु लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. माझे म्हणणे आहे, की लोकांनी तुमचे म्हणणे समजले नाही तर तुम्ही मागे सरकलेलेच बरे.'
पुलकित सम्राट सलमानचा मित्रच नव्हे तर मानलेली बहीण श्वेता रोहिल्लाचा पतीसुध्दा आहे. तो सलमानसोबत 'जय हो' सिनेमात झळकला होता. शिवाय सलमानचा भावोजी निर्माता अतुल अग्निहोत्रीच्या 'ओ तेरी' सिनेमातसुध्दा पुलकितने काम केले होते.
काय आहे सलमानचे प्रकरण-
गेल्या शनिवारी (25 जुलै) 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटामधील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्याच्या शिक्षेच्या विरोधात टि्वट केले होते. त्याने लिहिले होते, ‘टायगरऐवजी भाईला फाशी दिली जात आहे. अरे, टायगर कुठे आहे? भारतात टायगरचीच तर कमतरता आहे. टायगरला आणा. टायगर तुमचा भाऊ काही दिवसांत फासावर जाणार आहे. काही वक्तव्य? काही पत्ता? तुम्ही कुठे आहात, काहीतरी सांगा ना. भाऊ असा असावा? म्हणजे, याकूब मेमन. निरपराधाची हत्या म्हणजे मानवतेचा खूनच. टायगरला आणून फाशी द्या. दाखवण्यासाठी त्याच्या भावाला फाशी नको. हा टायगर म्हणजे मांजर नव्हे आणि आम्ही एका मांजरीला पकडू शकत नाही. शरीफ साहेब, जर तो (टायगर) तुमच्या देशात असेल तर कृपया सांगा. भाईला फाशी देऊ नका.’ या ट्विट्सवरून रविवारी देशभरात गदारोळ झाला होता.
वडिलांच्या सांगण्यावरून मागितली होती माफी-
वडील सलीम खान यांच्या म्हणण्यावरून सलमानने रविवारी (26 जुलै) संध्याकाळी माफी मागितली. त्याने 6 टि्वट्स करून सांगितले होते, ‘टायगर मेमनला फाशी द्यावे, असे म्हटले होते. मी त्यावर ठाम आहे. याकूबला निरपराध म्हणालो नाही, मला माझ्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे मुंबई बॉम्बस्फोटामध्ये अनेक लोकांनी जीव गमावले होते. परंतु एखाद्या निरपराधाचा मृत्यू संपूर्ण मानवतेचा मृत्यू आहे, असे मी म्हणालो होतो. गैरसमजाची शक्यता असल्याने ट्विट्स मागे घे, असे वडील म्हणाले, म्हणून ते मागे घेत आहे. गैरसमज झाला असेल तर बिनशर्त माफी मागत आहे.’
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सलमानचे शनिवारी रात्रीचे वादग्रस्त वक्तव्य केलेले टि्वट्स आणि रविवारी रात्रीचे माफीचे टि्वट...