आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pulkit Samrat Separates From His Wife Within A Year Of Marriage

मोडला सलमानच्या \'बहिणीचा संसार, गेल्यावर्षी प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झाले होते लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : श्वेता रोहिरा आणि पुलकित सम्राट
मुंबई- बातमी आहे, की बॉलिवू़ड अभिनेता पुलकित सम्राट आणि त्याची पत्नी श्वेता रोहिरा अखेर विभक्त झालेत. स्वत: श्वेताने याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. एका पब्लिकेशनला तिने सांगितले, 'मी आणि माझा पती पुलकित आता एकत्र राहत नाही, आम्ही विभक्त झालो आहोत. तो मला म्हणाला होता, की मी माझ्या कुटुंबासाठी तुझ्यापासून वेगळा होत आहे, आमच्यासाठी आमचे कुटुंबीय महत्वाचे आहेत. ते आमची लाइफलाइन आहेत. त्यानंतर मी त्यांना जे हवे होते ते दिले. कुटुंबासाठी पुलकितला सोडले.'
जेव्हा श्वेताला पुलकित आणि बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमीच्या अफेअरविषयी प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, 'याचे उत्तर पुलकित आणि यामीच देऊ शकतात.' 3 नोव्हेंबरला श्वेता आणि पुलकितच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. यापूर्वीसुध्दा त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तेव्हा स्वत: श्वेताने टि्वट करून याचे खंडन केले होते. सोबतच तिने पुलकितसोबतचा करवाचौथचा फोटो शेअर केले होता. फोटोसोबत तिने लिहिले होते, 'From karwachaut to wedding month'
सलमानची मानलेली बहीण आहे श्वेता-
पुलकित सम्राटने सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिराचे लग्न 3 नोव्हेंबर 2014ला गोव्यात झाले होते. स्वत: सलमानने श्वेताचे कन्यादान केले होते. यादरम्यान सलमानचा भाऊ अरबाज आणि भावोजी अतुल अग्निहोत्रीसुध्दा लग्नात उपस्थित होते. श्वेता मुंबईची एक सिंधी गर्ल आहे आणि बालपणापासून ती सलमानची चाहती आहे. एकेदिवशी ती सलमानच्या घरी पोहोचली आणि आईला म्हणाली मला सलमानला राखी बांधायची आहे. सलमानने लगेच होकार दिला आणि तेव्हापासून सलमान श्वेताचा भाऊ झाला. सलमान श्वेतावर सख्या बहिणीप्रमाणेच प्रेम करतो.
कसे जुळले श्वेता आणि पुलकितचे सुत-
पुलकित एकता कपूरच्या 'क्योकी सास भी कभी बहू थी' मालिकेत काम करत होता. त्यादरम्यान श्वेता एक ट्रेनी जर्नालिस्ट होती. त्यावेळी दोघांची भेट झाली आणि या भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झाले. दोघांनी साखरपुडा केला. पुलकित श्वेताला लग्नापूर्वीच मिसेस सम्राट म्हणत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पुलकित आणि श्वेताचे निवडक फोटो...