आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बहिणीवर पुलकितने साधला निशाणा, \'मिसकॅरेजच्या नावाखाली केले बदनाम\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राखी बहीण श्वेतासोबत सलमान आणि पुलकित सम्राट - Divya Marathi
राखी बहीण श्वेतासोबत सलमान आणि पुलकित सम्राट
मुंबई: बॉलिवूडमध्ये चर्चा आहे, की सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा आणि पुलकित सम्राट विभक्त होण्यामागे यामी गौतम कारणीभूत आहे. पुलकितने श्वेतासोबत 2014मध्ये लग्न केले होते. परंतु हे लग्न वर्षभरसुद्धा टिकले नाही. दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या आणि याचे कारण यामी असल्याचे बोलले जाऊ लागले. अलीकडेच बातमी आली आहे, की पुलकित आणि यामी यांच्यात जवळीक वाढली तेव्हा श्वेताला मिसकॅरेज झाले होते आणि तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता.
पुलकितने म्हटले, 'चार वर्षांपूर्वी झाले होते मिसकॅरेज'...
आता या प्रकरणात पुलकितने मौन तोडले आहे. तो म्हणाला, 'श्वेताच्या वक्तव्यांनी खूप दु:खी झालोय. मला जराही अंदाजा नव्हता, की श्वेता मला बदनाम करण्यासाठी मिसकॅरेजचा आधार घेईल.' सूत्रांच्या सांगण्यानुसार, श्वेताचे मिसकॅरेज 2015मध्ये झाले होते. पुलकितच्या सांगण्यानुसार, श्वेताचे मिसकॅरेज 2015मध्ये नव्हे तर 2012मध्ये झाले होते. तेव्हा त्यांचे लग्नसुद्धा झाले नव्हते.
माझी प्रतिमा मलिन करण्याचा श्वेताचा हेतू...
- पुलकितने सांगितले, श्वेताने पसरवलेल्या मिसकॅरेजच्या बातम्यांनी खूप हैराण होतो. हे एखाद्या कपलची खासगी गोष्ट असते. ती पब्लिकली करणे चुकीचे आहे. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवले, ज्याच्यासोबत मी वेळ घालवला त्या व्यक्तीने माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी
हे सर्व केले, याचे मला वाईट वाटले.
पुलकितच्या सांगण्यानुसार, 'मिसकॅरेजवेळी सनम रेचे शूटिंग सुरु नव्हते'...
पुलकितने सांगितले, 'आतापर्यंत मी शांत होतो. परंतु हे प्रकरण खूप वाढले आहे. मिसकॅरेजसारख्या पर्सनल गोष्टी बाहेर कशा येतात. अशाप्रकारच्या बातम्या वाचून खरंच श्वेतासोबतचे माझे नाते संपुष्टात आले आहे.' पुलकितने पुढे सांगितले, 'श्वेताने ज्या मिसकॅरेजविषयी सांगितले आहे, ते चार वर्षांपूर्वी झाले होते आणि तेव्हा यामीचा याच्याशी दूर-दूरपर्यंत संबंध नव्हता. या घटनेनंतर 'सनम रे'चे शूटिंग सुरु झाले होते.'
यापूर्वी ज्या बातम्या आल्या होत्या, त्यांच्यानुसार, श्वेताचे मिसकॅरेज झाले तेव्हा ती आईच्या घरी गेली होती. पुलकित तिला भेटायला तिथे जायचा. त्यावेळी पुलकित-यामीच्या 'सनम रे'चे शूटिंग सुरु झाले होते. त्यावेळी पुलकितने तिची काळजी घेण्याऐवजी शूटिंग आणि इतर वेळ यामीसोबत घालवत होता. त्यामुळे आमच्यात दूरावा निर्माण झाला.
सलमानच्या घरी समोरा-समोर आले पुलकित-श्वेता...
अलीकडेच सलमानने ईद पार्टीसाठी आमंत्रित केलेल्या श्वेता आणि पुलकितचा आमना-सामना त्याच्या घरी झाला. यादरम्यान श्वेताने पुलकितला पाहून दुर्लक्षित केले. तसेच एका कोप-यात उभ्या सलमानने हा नजारा पाहिला. परंतु त्याने ईद असल्याने यात बोलणे टाळणे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, पुलकित ईद पार्टीत दाखवण्याचा प्रयत्न करत होता, की श्वेतासोबत खटके उडाले असले तरी सलमानसोबत त्याचे नाते पूर्वीसारखेच आहे. काही दिवसांपूर्वी सलमान मानलेली बहीण श्वेतासोबत डेजी शाहचे नाटक 'बेगम जान' पाहायला गेला होता. त्यावेळी सलमानने श्वेताला पुलकितच्या नात्याविषयी विचारले होते. सलमानने श्वेताला विचारले होते, की इतके दिवस वेगळे राहूनसुध्दा तुम्ही कोर्टात घटस्फोटाचा खटला का दाखल केला नाही?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पुलकित-श्वेताचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...