आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी काही प्रेमात संपलेला प्रियकर नाही', कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीरने तौडले मौन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरवर अनेक आरोप लावण्यात आले. गेल्या कित्येक दिवसांत त्याला वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. मीडियाच्या प्रश्नांना कंटाळून तो आता पीआर एजन्सी ठेवणार असल्याच्याही चर्चा होत्या. तीन वर्षांपासून चर्चेत असलेला कॅटबरोबरचा त्याचा 'जग्गा जासूस' मोठ्या अडचणींनंतर शेवटी 14 जुलैला प्रदर्शित होणार असल्याचे ठरले आहे. निर्माता आणि कलाकार म्हणून 'जग्गा'च्या प्रमोशनामध्ये व्यग्र असणाऱ्या रणबीरने स्वत:ला मीडियासमोर प्रेझेंट केले. स्वत:विषयी त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी रणबीर म्हणाला, मी कायम सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक घटना, अपघात किंवा यश तुम्हाला काही ना काही शिकवते. माझ्या आयुष्यात करण जोहर खूप जवळचा माणूस आहे. जेव्हाही मी स्वत:ला एकटा समजतो तेव्हा मी त्याच्याशी गप्पा मारतो. काही अडचण असल्यास मी त्याच्याकडूनच सल्ला घेतो. 
 
Q.  तीन वर्षे लागली 'जग्गा'ला, कसे अॅडजस्ट केले? 
A. अवघड होते. कारण तीन वर्षांत मी वेगवेगळे तीन चित्रपट केले. जग्गातील कॅरेक्टर एका सामान्य तरुणाचे आहे. तीन वर्षांत मीही मोठा झालोय. मुळात चित्रपट पूर्ण झाला हेच माझ्यासाठी स्वप्नवत होते. असे वाटते, पुन्हा अनुराग दादाला फोन लावावा आणि विचारावे शेड्यूल कुठे आहे? 
 
Q. तू म्हणतोस मी मोठा झालोय, म्हणजे? 
A. दरवर्षी वय वाढते. नवीन अनुभव येतात, दुनियादारी समजते. मी माझ्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक नाते, अपघात, वेळ वेगवेगळे अनुभव देते. 
 
आणखी काय म्हणाला रणबीर, जाणून घ्या... 
बातम्या आणखी आहेत...