आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • R Madhavan Celebrates His 45th Birthday With Dainikbhaskar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: 45 वर्षांचा झाला आर. माधवन, शेअर केल्या आयुष्यातील रंजक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आर. माधवन)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता आर. माधवन सध्या डबल सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. आज माधवनचा वाढदिवस असून त्याने वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. तर अलीकडेच रिलीज झालेला त्याचा 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. त्यामुळे सध्या तो भलताच खुशीत आहे. माधवनने हा दुहेरी आनंद साजरा करण्यासाठी फॅमिली आणि इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक खास पार्टी प्लान केली आहे.
माधवनने dainikbhaskar.com सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने आमच्यासोबत आपल्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या.
>> यंदाच्या वाढदिवसाचे काय प्लान्स आहेत. हे तुझ्यासाठी दुहेरी सेलिब्रेशनचे निमित्त आहे ?
- बर्थडे सेलिब्रेशन माझ्यासाठी एक मोठी डील आहे. कारण मी 45 वर्षांचा झालोय. (हसून) यानिमित्ताने मित्रांसाठी एक पार्टी ठेवली आहे. सिनेमाच्या यशाच्या सेलिब्रेशनविषयी बोलायचे झाले तर हे माझ्यासाठी एकादिवसापेक्षा अधिक नसते. मी अलीकडेच एक पार्टी दिली होती. त्यावेळी खूप ड्रिंक केले होते. एन्जॉय केले आणि दुस-या दिवशी पुन्हा कामाला लागलो.
>> बालपणीच्या वाढदिवसाचा एखादा किस्सा शेअर करायला आवडेल का ?
- मी एक लकी चाइल्ड राहिलोय, मला जे हवे ते मिळाले आहे. मला बाइक्स खूप पसंत आहेत. त्यामुळे कुणाला जर मला गिफ्ट द्यायचे असेल, तर त्याला ठाऊक असायला हवं की मला काय आवडतं. (हसून)
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, आर. माधवनच्या खासगी आयुष्यातील आणखी काही रंजक गोष्टी...