आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले 'जुली 2' चे ट्रेलर, दिसला धोनीच्या EX गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायरेक्टर दीपक शिवदासानी यांचा चित्रपट ज्युली 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या टीझरप्रमाणेच ट्रेलरमध्येही मोठ्या प्रमाणावर बोल्ड कंटेंट पाहायला मिळत आहे. साऊथच्या चित्रपटात अॅक्ट्रेस रायलक्ष्मी या चित्रपटात लीड रोलमध्ये असून ती बॉलिवूडमध्ये याद्वारे पदार्पण करत आहे. यापूर्वी तिने 'अकिरा' चित्रपटात कॅमियो केला आहे. ट्रेलरमध्येच रायलक्ष्मीचा अत्यंत हॉट आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. अॅक्टर रवी किशनबरोबर तिचा लिपलॉकही दाखवण्यात आला आहे. हॉट सीन्स, हाइप्रोफाईल लाइफ, मर्डर, डान्स आणि थ्रिलर या सर्वांचा समावेश ट्रेलरमध्ये आहे. या थ्रिलर चित्रपटात बॉलिवूडचे सत्य, राजकारण आणि अंडररवर्ल्डचे कनेक्शन दाखवण्यात येणार आहे. रायलक्ष्मी क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची एक्स गर्लफ्रेंड म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

ऐसे डायलॉग्सही बोल्ड.. 
'ज्युली -2' चे ट्रेलर जेवढे हॉट आहे, डायलॉग्सही तेवढेच बोल्ड आहेत. ट्रेलरमध्ये, 'यहां पर सिर्फ बॉडी चलता है गरमा गरम बॉडी..' असे डायलॉग आहेत.  त्याचप्रमाणे इतरही डायलॉग आहेत. 'हीरोइन तो तू कल बन सकती है सिर्फ कॉम्प्रमाइज करना सीख ले', 'दोस्ती निभाने के लिए बराबर की जरूरत पूरी होनी चाहिए', 'आज 25 दिसंबर 2015, आज मेरा जनम हुआ है, जनम तो मेरा 25 साल पहलेहुआ था लेकिन तब मैं नाजायज औलाद थी', 'मेरी जिदंगी का एक ही मकसद है प्यार पाना', 'अगर चार घंटे में शहर नहीं छोडा तो चेहरे पर तेजाब फेंक देंगे', 'ये एक हाईप्रोफाइल सेलिब्रिटी पर हमला करने की साजिश है'।

2004 मध्ये आलेल्या ज्युली चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटांत रायलक्ष्मीबरोबर रवी किशन, रती अग्निहोत्री, आदित्य श्रीवास्तव, शशी किरण, विवेक वासवानी, अंकित व्यास, ब्रिज गोपाल, विकास श्रीवास्तव झळकणार आहेत. चित्रपटाचे निर्माते दीपक शिवदासानी आणि विजय नायर आहेत. तर वितरक सेंसॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा ट्रेलरचा व्हिडीओ..
बातम्या आणखी आहेत...