आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Godwoman Radhe Maa's Illicit Love Affair With Bollywood Producer Ranjeet Sharma

खळबळजनक खुलासा : बॉलिवूड निर्मात्यासोबत होते राधे माँचे प्रेमसंबंध!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः राधे माँ आणि निर्माता रणजीत शर्मा - Divya Marathi
फाइल फोटोः राधे माँ आणि निर्माता रणजीत शर्मा
नवी दिल्लीः कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात अडकलेल्या आणि स्वंयघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ संदर्भात रोज नवे खुलासे होत आहेत. राधे माँ अर्थात सुखविंदर कौर हिच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा बॉलिवूड निर्माता रणजीत शर्मा यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रणजीत शर्मा यांनी हा दावा केला आहे. पंजाबच्या रणजीत शर्मा यांनी जवळजवळ 27 वर्षांपूर्वी आपण राधे माँच्या सर्वात जवळची व्यक्ती होतो अशी माहिती दिली आहे. शिवाय राधे माँ आणि आपल्यामध्ये प्रेमसंबंध होते असा दावाही त्यांनी केला आहे.
या मुलाखतीत रणजीत शर्मांनी सांगितले, "अकरावीची परीक्षा संपल्यानंतर मी सुटीत माझ्या बहिणीकडे मुकेरियाला गेलो होतो. तेव्हा पंजाब काँग्रेसचे तत्कालीन मंत्री केवल किशनच्या पीएने राधे माँसोबत माझी भेट घालून दिली होती. त्यानंतर आमच्यात जवळीक वाढत गेली."
रणजीत यांनी सांगितले, त्यावेळी माझे वय 18 वर्षे होते. तर राधे माँ विवाहित आणि दोन मुलांची आई होती. मात्र जेव्हा माझ्या भावोजींना आमच्या प्रेमप्रकरणाविषयी समजले तेव्हा त्यांनी मला लगेच अजमेरला माझ्या घरी परत पाठवले.
आता या बातमीत किती तथ्य आहे, हे तर रणजीत शर्मा आणि राधे माँ यांनाच ठाऊक.
राधे माँवर सिनेमा बनवण्याच्या विचारत रणजीत शर्मा
बातम्यांनुसार, रणजीत शर्मा राधे माँवर एक सिनेमा बनवण्याचा विचारात आहेत. इतकेच नाही तर अभिनेत्री मल्लिका शेरावतला या सिनेमात मुख्य भूमिकेत घेण्याचाही निर्मात्यांचा विचार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, वैयक्तिक आयुष्‍य अंत्‍यत ऐशोरामात जगणा-या राधे माँच्या लग्जरी सुविधा उपलब्ध असलेल्या खोलीची खास झलक...