आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Leak झाला होता राधिका आपटेचा हा इंटीमेट सीन, सेन्सॉर बोर्डने सिनेमात केला Blur

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आगामी 'पार्च्ड' या सिनेमात राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांच्यावर चित्रीत झालेले बेडरुम लव्ह मेकिंग सीन ब्लर करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या हस्तक्षेपानंतर निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. असे म्हटले जाते, की यावरुन सिनेमाचा निर्माता अजय देवगणची सेन्सॉर बोर्डासोबत बराच वाददेखील झाला. मात्र अजयला सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे ऐकावे लागले आणि सिनेमातील बोल्ड सीन ब्लर करावा लागला.

राधिका म्हणाली, स्वतःच्या शरीराविषयी कसली लाज...
राधिकाने एका मुलाखतीत म्हटले, "माझे शरीर हे अभिनयाचं एक माध्यम आहे आणि मी ते वापरते. मला माझ्या शरीराची लाज वाटत नाही. बोल्ड दृश्य देतानाही मला काही वेगळं करतेय असं वाटत नाही. मी त्यात कम्फर्टेबल असते."

इंटीमेट व्हिडिओ लीक झाल्यानंतर भडकली होती राधिका...
याच महिन्यात 'पार्च्ड'मधील राधिका आणि आदिल हुसैन यांचा हा इंटीमेट व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. यावरुन राधिकाला प्रश्न विचारला असता, ती संतापली होती. ती म्हणाली होती, "अखेर याला राधिका आपटेचा सेक्स सीन असे का म्हटले जात आहे. आदिल हुसैनचा सेक्स सीन असे का म्हटले जात नाहीये? याचा अर्थ पुरुषाने केली तर ती न्यूज नसते आणि एखाद्या महिलेने केले तर त्यावरुन चर्चा सुरु होते."


लॅक्मे फॅशन वीकच्या काळात राधिकाने हे वक्तव्य केले होते. यासोबतच ती म्हणाली होती, "तुम्हाला सांगू इच्छिते, की ही क्लिप लीक झालेली नाही. हा सिनेमा ऑल ओवर द वर्ल्ड रिलीज झाला आहे. त्यामुळे तुम्ही थोडा रिसर्च करा. हा सिनेमा यूएसएमध्ये नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे." लीना यादव दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 23 सप्टेंबर रोजी भारतात रिलीज होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'पार्च्ड' सिनेमातील काही सीन्स PHOTOS मध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...