मुंबई- बातमी आली होती, की बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने अलीकडेच लीक झालेल्या आपल्या न्यूड व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. परंतु राधिका स्वत: या बातमीचे खंडन करते. तिने गुरुवारी (30 एप्रिल) टि्वटरवर लिहिले, 'Just to clarify I have not reacted or given any statement to any news outlet.' (मी स्पष्ट करू इच्छिते, की मी कोणत्याही न्यूज वेबसाइटला प्रतिक्रिया दिलेली नाहीये)
काही मीडिया हाऊसेसने ही बातमी प्रकाशित केली होती. राधिकाला आपला न्यूड व्हिडिओ फनी वाटला होता. मीडिया हाऊसेसनुसार, 'बदलापूर' आणि 'हंटर' फेम राधिकाने लीक व्हिडिओवर सांगितले, 'मी हा व्हिडिओ पाहिला आणि हसले. कारण हा खूपच हस्यास्पद आहे. परंतु माझ्याकडे या सर्वांसाठी वेळ नाहीये. माझ्या आणि माझ्या कुटुंबीय या गोष्टीचा जराही फरक पडलेला नाहीये. जगात अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे काम नाहीये. ते घरी बसून जे करायचे ते करतात. त्यामुळे तुम्ही असे व्हिडिओ पाहून आपला वेळ वाया घालवू नका.'
काय आहे प्रकरण?
'लय भारी', 'बदलापूर', 'हंटर' यांसारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिचा न्यूड व्हिडिओ व्हाट्स अॅपवर लीक झाला होता. हा अनुराग कश्यपच्या सिनेमाचा एक शॉट होता. राधिकाची 20 सेकंदांची एक छोटी क्लिप सध्या वॉट्स अॅप आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर झपाट्याने पसरत आहे. सत्यकथेवर आधारित या शॉर्ट फिल्ममध्ये राधिकाने न्यूड सीन दिला आहे. अनुरागच्या हा सिनेमा कधी रिलीज होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. मात्र या शॉट फिल्ममधील एक एक क्लिप लीक झाल्यानंतर अनुराग यांनी थेट मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हिडिओविषयी अनुराग कश्यपने काय टि्वट केले...