आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावर मेंदी, लाल चुडा घातलेल्या मराठमोळ्या राधिकाचे हे नवे रुप वेधून घेईल तुमचे लक्ष!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे कायम आपल्या वेगवेगळ्या लूकने चर्चेत असते. मग ते रुप सिनेमातील असो वा जाहिरातीमधील... ती नेहमीच आपल्या लूक आणि अदाकारीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. नुकतीच राधिका एका नव्या रुपात रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र एखाद्या सिनेमातून नव्हे तर एका जाहिरातीमधून... या जाहिरातीत राधिका नववधूच्या रुपात दिसत असून तिच्या हातावर मेंदी आणि लाल चुडा दिसतोय. आपल्या नवऱ्याला चहा कितीला आणि कशी बनवून द्यायचा हा प्रश्न या नववधुला पडला आहे. त्यासाठी तिची खटपट चालली आहे. मात्र सकाळी नवराच तिला चहा आणून देतो, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद राधिकाने अगदी हुबेहुब दाखवला आहे. मदर डेअरीच्या जाहिरातीत राधिकाने नववधू अतिशय सुंदर रेखाटली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा राधिकाच्या जाहिरातीची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...