आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी कोणालाही घाबरत नाही, MMS क्लिपवर बोलली राधिका आपटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी मुलींनी बॉलीवूडपटांमध्ये जाऊन एक्सपोझ केल्याची किंवा लव्हमेकिंग सीन दिल्याच्या घटना ह्या अगोदरही अनेकदा घडल्यात. पण राधिका आपटेचे गेल्या काही माहिन्यात बाहेर आलेल्या एमएमएस क्लिपने गहजबच माजवला.
कधी तिने केलेल्या फिल्मच्या एडिटरूममधन बाहेर आलेल्या त्या क्लिप्स होत्या. तर काही उगीच कोणीतरी तिच्या नावाचा वापर करून तिच्या नसलेल्या एमएमएस क्लिप तिच्या असल्याचे भासवले होते. लोकांनी तिच्याबद्दल उलट-सुलट चर्चा केल्या.
तिने एकदा त्यावर ट्विट करून आपल्या पध्दतीने स्पष्टीकरणही दिले. पण दहा तोंडाने दहा जण बोलत असतील, तर त्यावर काय करणार, असा विचार करून आता राधिकाने ह्या सगळ्यावर विचार करणे सोडले आहे.
ती म्हणते,” मी लोकांच्या चर्चांचा विचार करत नाही. मी फक्त काम करत राहते. मी पेपर वाचणंही सोडून दिलंय. आता ऑनलाइनच जास्त असते. आणि लोकं काय म्हणतील, म्हणून कधीच घाबरतं नाही. मला काय करायचंय हे मला चांगलं ठाऊक आहे.”
राधिकाच्या सध्या दोन फिल्म लागोपाठ रिलीज होतायत. ‘मांझी-दि माउन्टनमॅन’च्या पाठोपाठ ‘कौन कितने पानी में’ रिलीज होतेय. त्यानंतर लवकरच ती रजनीकांतच्या चित्रपटासाठीही शुटिंग करणार आहे. ती म्हणते,” मी एखादया चित्रपटात एखादा सीन केला तर त्यावर बोलू शकते. पण लोकांच्या बिनबुडाच्या चर्चांवर काय रिएक्ट होणार. मी अशा गोष्टींवर रिएक्ट करणंच सोडून दिलंय. आपण बरं, की आपलं कामं बरं. मी इथे अभिनयात करीयर करायला आलीय. आणि माझं पूर्ण लक्ष माझ्या करीयरवर आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राधिकाने तिची एमएमएस क्लिप बाहेर आल्यावर केलेले ट्विट