आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव्या आसमानवर राधिका, रजनिकांत यांच्यासोबत काम करण्याची मिळाली संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधिका आपटेची 'अब तो निकल पडी' असेच म्हणावे लागेल. कारण राधिकाला एक मोठी लॉटरीच लागली आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनला मागे टाकत तिला सुपरस्टार रजनिकांत यांच्यासोबत काम करण्यासाठी संधी चालून आलीये. अभिनेत्री राधिका आप्टे 'अहल्या' या शॉर्टफिल्ममुळे चर्चेने प्रकाशझोतात असतानाच आता तिच्या पदरी ही एक नवीन ऑफर पडली आहे.

दिग्दर्शक रंजित विद्या बालनला या सिनेमात साइन करण्याचा विचार करत होते, मात्र त्यांनी ही संधी राधिकाला दिली.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'रजनिकांत आणि दिग्दर्शक रंजित यांच्या या सिनेमात राधिकाला संधी देण्यात आली आहे.' राधिकाने यापूर्वी 'हंटर', 'बदलापूर', 'लय भारी'सारख्या सिनेमांत काम केले आहे. त्यामुळे ही संधी तिच्या करिअरसाठी महत्वाची ठरेल. ही ऑफर तिच्यासाठी करिअरसाठी टर्निंग पॉइंट असेल.