आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhika Apte's Inspiring Video For Every Women Find Your Beautiful

''कसलाही विचार करु नका, तुम्ही जशा आहात त्यात सौंदर्य शोधा'', असं का म्हणतेय राधिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे एक बेधडक आणि रोखठोक मत मांडणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या याच स्वभावाची ओळख करुन देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. Find Your Beautiful असे शीर्षक असलेल्या व्हिडिओत राधिकाने महिलांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यास सांगत आहे.

अनेक महिला सुंदर असण्यावर भर देताना दिसतात. मात्र सुंदरता कशात आहे? सुंदरता कशाला म्हणतात? हे राधिका या व्हिडिओत सांगताना दिसत आहे. अनेक महिला जाड असल्याने चिंतेत असतात. त्यामुळे त्या स्वतःची कुंचबना करून घेत असतात. मात्र कशाचाही विचार करू नका. हे आयुष्य तुमचे आहे, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा, तुम्ही जशा आहात त्यात सौंदर्य शोधा, तुमचे शरीर सुंदर आहे, हाइट कधी छोटी नसते, स्किन कलर हा शेड गार्ड नसतो, असे राधिका या व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

जीवनाकडे सकारात्म दृष्टीने बघण्यास सांगणारा राधिकाचा हा खास व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....