आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रईस'ने कमावले 109Cr, सक्सेसनंतर अबरामसोबत Srkची सुवर्णमंदिराला भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अमृतसरः अभिनेता शाहरुख खानच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'रईस' या सिनेमाने 7 दिवसांत 109 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने मंगळवारी रात्री त्याचा धाकटा मुलगा अबरामसोबत अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली. यावेळी 'रईस' या सिनेमाचे निर्माते रितेश सिधवानी त्यांच्यासोबत होते. येथील फोटो सोशल मीडियावर शेअर करत शाहरुखने लिहिले, "At the Sri Darbar Sahib. Peace and love and all feelings beautiful. Thank u Amritsar." 

हरमंदिर साहिबला भेट देऊन शाहरुख आणि अब्रामने मोठ्या भक्तिभावाने नतमस्तक होत या श्रद्धास्थळापाशी प्रार्थना केली. यावेळी शाहरुख आणि अब्रामने हरमंदिर साहेब येथील प्रसादही घेतला, त्यासोबतच या दोघांच्याही हातात शीख संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारा ‘कडा’ही पाहण्यात आला.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सुवर्णमंदिरात पोहोचलेल्या शाहरुख आणि अबरामचे Photos आणि शेवटच्या स्लाईडवर Video...
बातम्या आणखी आहेत...