आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raees Is Reportedly Based On The Life Of Gangster Abdul Latif

शाहरुखचा \'रईस\' अडचणीत, गँगस्टरच्या मुलाने मागितले तब्बल 101 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - शाहरुख खानचा आगामी चित्रपटर रईस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. गुजरातचा गँगस्टर अब्दुल लतीफच्या मुलाने दाखल केलेल्या याचिकेवर अहमदाबाद कोर्टाने शाहरुखच्या प्रोडक्शन हाऊसला नोटीस बजावली आहे. हा चित्रपट लतीफच्या आयुष्यावर बेतलेला आहे. त्यामुळे त्याचा मुलगा मुश्ताक अहमदने कोर्टात याचिका दाखल केली. वडीलांचे नाव खराब केल्याचा आरोप त्याने केला असून त्याची भरपाई म्हणून 101 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

पित्याची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करुन मागितली भरपाई
- मुश्ताकने शाहरुखवर या चित्रपटाच्या माध्यामातून लतीफची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला.
- त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि प्रमोशनवर बंदींची मागणी केली आहे.
- त्याचा दावा आहे, की चित्रपटाच्या उत्तरार्धात लतिफला चुकीच्या पद्धतीने रंगवलेले आहे.
- त्यामुळे मुश्ताकने 101 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

स्क्रिप्ट लिहिताना घेतली कुटुंबाची भेट
- मुश्ताकचे म्हणणे आह, की चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात होती तेव्हा काही लोक त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले होते.
- निर्माते आता प्रचारही करत आहेत, की हा चित्रपटर लतिफच्या आयुष्यावर आहे.
- या चित्रपटात शाहरुखसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, कोण होता लतीफ