आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल-असीनच्या लग्नात हे शेफ बनवणारेय व्यंजन, अनेक सेलेब्स आहेत यांचे फॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ अली खानसोबत शेफ निशांत चौबे: फाइल फोटो - Divya Marathi
सैफ अली खानसोबत शेफ निशांत चौबे: फाइल फोटो

नवी दिल्ली/मुंबईः मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा आज (मंगळवार) असीनसोबत लग्नगाठीत अडकले. दिल्लीतील हॉटेल दुसित देवरान येथे हा लग्नसोहळा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नात शेफ निशांत चौबे पाहुण्यांसाठी क्युजिन तयार करतील. निशांत यांनी यापूर्वी अनेक सेलिब्रिटींसाठी स्वादिष्ट व्यंजन बनवले आहेत.
कोणकोणत्या सेलिब्रिटींनी केलंय निशांतचे कौतुक
निशांत यांनी वेडिंग कपल (असीन-राहुल) साठी एक खास केक तयार केला आहे. यांच्या कुकिंगचे कौतुक अमिताभ बच्चन, हृतिक रोशनपासून ते सैफ अली खान यांच्यापर्यंत सर्वांनी केले आहे. निशांतच्या हातचे बर्गर सैफला खूप आवडतं.
कोण आहे निशांत चौबे ?
निशांत हॉटेल दुसित देवरान येथील शेफ आहे. ते जगातील अशा सहा शेफपैकी एक आहेत, ज्यांची लुसियानास्थित जॉन फोल्स क्युलिनरी इन्स्टिट्युट ऑफ अमेरिका येथे ट्रेनिंगसाठी निवड झाली होती. ते सिंगापूर येथे झालेल्या वर्ल्ड गोर्मेट समिटमध्येही सहभागी झाले होते. याशिवाय मास्टर शेफसाठीही त्यांची निवड झाली होती. त्यांना बंगाली, इंग्रजी आणि फ्रेंच भाषा अवगत आहे.
अनेक सेलिब्रिटींसाठी केलंय काम
जगभरातील अनेक नावाजलेल्या हॉटेल्समध्ये निशांत यांनी काम केले आहे. भारतातील ताज ग्रुप, ओबरॉय ग्रुप, अर्जुन रामपालचे लाउंज लॅप, रोहित बलचे हॉटेल सीबा, ऑलिव बीच येथेही त्यांनी काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शेफ निशांत यांची निवडक छायाचित्रे...