आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Babbar Crop Dharmendra And Vinod Khanna From The Photo

राज बब्बर यांनी शेअर केलल्या फोटोतून धर्मेंद्र-विनोद यांना हटवले, सोशल साइटवर चर्चेला उधाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा गांधींसोबत बॉलीवुड स्टार्स, राज बब्बर यांनी हा फोटो शेअर केला आहे. - Divya Marathi
इंदिरा गांधींसोबत बॉलीवुड स्टार्स, राज बब्बर यांनी हा फोटो शेअर केला आहे.
मुंबईः बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी राज बब्बर यांनी अलीकडेच ट्विटरवर एक अतिशय जुने छायाचित्र शेअर केले आहे. तेव्हापासून हे छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे. या छायाचित्रात लता मंगेशकर, दिलीप कुमार, राज कपूर, मनोज कुमार आणि दारा सिंहसह बरेच सेलेब्स इंदिरा गांधी यांच्यासोबत दिसत आहे. राज बब्बर यांनी या छायाचित्रासोबत ट्विट केले, "Excellent Pic. Indira Gandhi ji with leading Film personalities.".
या छायाचित्राविषयी सांगायची खास गोष्ट म्हणजे, राज बब्बर यांनी हे क्रॉप करुन शेअर केले आहे. या छायाचित्रातून त्यांनी धर्मेंद्र आणि विनोद खन्ना हे फेमस स्टार्स गायब आहेत. अखेर राज बब्बर यांनी हे छायाचित्र क्रॉप का केले? यावरुन सोशल साइटवर चर्चेला उधाण आले आहे. यामागे एखादे राजकिय कारण तर नाही ना... असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज बब्बर काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तर धर्मेंद्र आणि विनोद खन्ना बीजेपी पक्षाशी जुळलेले आहेत. हे दोघे दुस-या पक्षातील असल्यामुळे राज बब्बर यांनी त्यांना फोटोतून हटवले, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, खरे छायाचित्र...