पेशावर- शोमॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राज कपूर यांची पेशावरमध्ये एक ऐतिहासिक हवेली आहे. या हवेलीचा वरचा मजला मालकांने मार्केट बनवण्यासाठी पाडला. दुसरा आणि तिसरा मजल्याचीसुध्दा तोडफोड करण्यात आली होती. मात्र खैबर पख्तूनख्वाच्या अधिका-यांनी वेळ न घालवता कोर्टाकडून ही हवेली न पाडण्याचे आदेश आणले आणि हवेली जमीनदोस्त होण्यापासून वाचवली.
हवेलीची तोडफोड करणा-या कामगारांना केली अटक...
- खैबर पख्तूनख्वा सरकारने पेशावरमध्ये जन्मलेल्या राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या घरांना वारसा म्हणून घोषित केले आहे.
- अधिका-यांनी सांगितले, की हवेली जमीनदोस्त न होण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. हवेलीची तोडफोड करणा-या कामगारांना अटक करण्यात आली आहे.
- राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूरने टि्वट करून हवेली जमीनदोस्त करण्याचा विरोध करणा-या पकिस्तानमधील स्थानिक नागरिकांचे आभार मानले आहे.
1918 बनली होती कपूर हवेली...
- 1918मध्ये राज कपूर यांचे आजोबा आणि पृथ्वीराज कपूर यांचे वडील दीवान बसवेश्वरनाथ कपूर यांनी 'कपूर हवेली' उभी केली होती.
- या हवेलीत पृथ्वीराज यांचा धाकटा भाऊ त्रिलोक कपूर आणि मुलगा राज कपूर यांचा जन्म झाला होता.
- मात्र, राज कपूर यांचे दोन्ही भाऊ शम्मी आणि शशि भारतात जन्मले. कपूर कुटुंबीय येथे येत असतात.
- 1947मध्ये फाळणी झाल्यानंतर कपूर घराणे भारतात गेले. तेव्हा हवेलीचा मालकी हक्क दुस-या व्यक्तीला देण्यात आला होता.
- 1990मध्ये शशि कपूर मुलांसोबत आणि रणधीर-ऋषी कपूर आपल्या कुटुंबासोबत हवेली पाहण्यासाठी गेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या हवेलीची निवडक छायाचित्रे...