मुंबईः कार्टर रोडस्थित राजेश खन्ना यांचा 'आशीर्वाद' हा बंगला जमीनदोस्त करण्यात येतोय. मिळालेल्या माहितीनुसार, या बंगल्याचे नवीन मालक शशी किरण शेट्टी या जागेवर नवीन इमारत उभारत आहेत. आता या जुन्या बंगल्याऐवजी येथे नवीन पाच मजली इमारत उभी होणार आहे. यासाठी तीन कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. नवीन इमारतीत 9 बेडरूम, टेरेस, पूल, गार्डन आणि एक मोठे कोर्टयार्ड असेल. या आलिशान घरात ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी शशी किरण शेट्टी, त्यांच्या मातोश्री, पत्नी आणि दोन मुले राहणार आहेत.
कसे असेल शशी किरण शेट्टी यांचे नवीन घर...
- नवीन बिल्डिंगमध्ये एकुण नऊ खोल्या असणार आहेत.
- पहिल्या मजल्यावर दोन मोठ्या खोल्यांसोबत अटॅच बेडरुम असेल.
- दुस-या मजल्यापासून ते पाचव्या मजल्यापर्यंत एक-एक मोठ्या रुम असतील.
- प्रत्येक मजल्यावर बालकनी असेल आणि घराच्या ओपनिंगला सी फेसिंग टेसेस असणार आहे.
90 कोटीत झाली होती बंगल्याची विक्री...
- राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्याची 90 कोटींना विक्री झाली होती.
- 6,500 स्वे. फुटचा हा बंगला राजेश खन्ना यांनी राजेंद्र कुमार यांच्याकडून विकत घेतला होता.
- 1970 साली साडे तीन लाख रुपयांत राजेश खन्ना यांनी हा बंगला खरेदी केला होता.
राजेश खन्ना यांच्यासाठी लकी ठरला होता बंगला...
- असे म्हटले जाते, की हा बंगला राजेंद्र कुमार यांच्यासाठी लाभदायी ठरला नव्हता. त्यांचे एकामागून एक सिनेमे फ्लॉप ठरत होते. याउलट हा बंगला राजेश खन्नांसाठी लकी ठरला होता.
- या घरात राहायला आल्यानंतर राजेश खन्नांचे एकामागून एक 15 सिनेमे हिट झाले होते.
पुढील स्लाईड्सवर बघा, बंगल्याचे 2 PHOTOS...