आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांच्या 'कबाली'ने रिलीजपूर्वीच कमावले 200 कोटी, टीझरला 2 Cr व्ह्यूज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनीकांत यांचा 'कबाली' सिनेमा जुलैमध्ये रिलीज होणार आहे. - Divya Marathi
रजनीकांत यांचा 'कबाली' सिनेमा जुलैमध्ये रिलीज होणार आहे.
चेन्नई: रजनीकांत यांच्या 'कबाली' या आगामी सिनेमाने सॅटेलाइट आणि डिस्ट्रीब्यूशन राइट्स विकून 200 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाचे बजेट 160 कोटी आहे. असे पहिल्यांदाच होणार आहे, की एखादा भारतीय सिनेमा जगभरात 5000 स्क्रिनवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा मलेशिया, चाइनीज आणि थाई भाषेत डब करण्यात आला आहे. सिनेमा 1 जुलैला रिलीज होणार आहे.
- सिनेमाचे निर्माते कलाईपुली थानु यांच्या सांगण्यानुसार, कबालीसाठी 500 स्क्रिन यूएसमध्ये असेल.
- प्रमोशनसुध्दा मोठ्या स्तरांवर होणार आहे. अशियाच्या काही फ्लाइट्स कबाली थीमवर पेंट केल्या जातील.
- फ्लाइटमध्ये प्रवास करणारे प्रवाशांना कबाली स्पेशल मेन्यू सर्व्ह केला जाईल.
- सिनेमाचा पहिला टीझर 1 मे रोजी लाँच करण्यात आला. हा टीझर यूट्यूबवर 2 कोटी लोकांनी पाहिला.
- जवळपास 67 सेकंदाच्या या टीझरमध्ये रजनीकांत वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.
- अलीकडेच, सोशल मीडियावर सिनेमाचे म्यूझिक रिलीज करण्यात आले.
'सुल्तान'च्या टीझरला टाकले मागे...
- कबालीचा टीझर आतापर्यंत सर्वाधिक पाहिला गेलेला टीझर बनला आहे.
- आतापर्यंत कबालीचा टीझर 2 कोटींपेक्षा (20 मिलिअन) जास्त लोकांनी पाहिला. दुसरीकडे सुल्तानचा टीझर 50 लाख (5 मिलिअन) लोकांनी पाहिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, ताइवानचा सुपरस्टार बनला व्हिलन...
बातम्या आणखी आहेत...