आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतच्या \'काला...\'चे पहिले पोस्टर रिलीज, \'थलाईवा\'सोबत झळकणार हा मराठमोळा चेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 'काला करिकालन' हे त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव असून त्यांचा जावई धनुष या सिनेमाचा निर्माता आहे. धनुषने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज केले. हा सिनेमा पा. रंजीत (Pa. Ranjith) दिग्दर्शित करणार आहेत. 
 
गँगस्टर बनले रजनीकांत...
धनुषने रिलीज केलेल्या एका पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा उग्र आणि भयावह अंदाज बघायला मिळतोय. तर आणखी एका पोस्टरमध्ये ते धारावी झोपडपट्टीत एका जीपवर बसलेले दिसत आहेत. या सिनेमात रजनीकांत गँगस्टरची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाची कथा मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा होती. पण निर्मात्याने ती नाकारली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत निर्माता धनुषने सांगितले, "हा सिनेमा हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित नाही. ही बायोपिक नसून एक काल्पनिक चित्रपट आहे." 
 
5 कोटींचा उभारणार सेट...  
'कबाली'नंतर दिग्दर्शक पा. रंजीत (Pa. Ranjith) यांचा रजनीकांत यांच्यासोबतचा हा दुसरा सिनेमा आहे. संतोष नारायणन हे या सिनेमाचे संगीतकार आहेत. चेन्नईमध्ये मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा सेट उभारण्यात येणार आहे. सिनेमाशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "5 कोटींच्या बजेटमध्ये चेन्नईत धारावीचा सेट उभारण्यात येणार आहे. येथे सिनेमाच्या मुख्य भागांचे शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे." तामिळ, तेलगू आणि हिंदीत हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. 
 
मराठमोळी अंजली पाटील झळकणार रजनीकांतसोबत...
हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अंजली पाटील काला या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत झळकणार आहे. अंजलीसोबतच अभिनेत्री हुमा कुरैशी हिचीही महत्त्वाची भूमिका या सिनेमात असेल. 

कोण आहे अंजली पाटील आणि कसा आहे रजनीकांत यांचा 'काला करिकालन' सिनेमातील लूक बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...