आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajinikanth Told Amitabh Bachchan Not To Play Villain In Robot 2

रजनीकांतच्या सांगण्यावरून अमिताभ यांची 'रोबोट-2' मधून माघार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुपरस्टार रजनीकांत यांच्या सांगण्यावरून महानायक अमिताभ बच्चन यांनी "रोबोट-२' या चित्रपटातील खलनायकाची भूमिका नाकारल्याचे समोर आले आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांनीच ही माहिती टि्वटरवरून चाहत्यांना दिली.

२०१० मध्ये आलेल्या "रोबोट' चित्रपटात रजनीकांत आणि ऐश्वर्या रॉय यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट झाला होता. आता शंकर "रोबोट-२' चित्रपट बनवत आहेत. यात रजनीकांत मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी शंकर यांनी अमिताभ यांना विचारणा केली होती. त्यानंतर बच्चन यांनी आपला मित्र रजनीकांतला फोन करून याबाबत माहिती दिली. त्यावेळी रजनीने त्यांना ही भूमिका न स्वीकारण्याचा सल्ला दिला. तसेच खलनायकाच्या भूमिकेत लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत, असेही सांगितले. त्यानंतर लगेच बच्चन यांनी शंकर यांना फोन करून ही भूमिका करणार नसल्याचे सांगितले. यश चोप्रा बॅनरच्या "धूम-४' चित्रपटात अमिताभ भूमिका करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी माध्यमातून आल्या होत्या. मात्र, या वृत्ताचे बच्चन यांनी खंडण केले. अमिताभ सध्या बीजॉय नांबियार यांच्या "वजीर' चित्रपटात काम करत आहेत. यात त्यांच्यासोबत फरहान अख्तर आणि आदिती राव हैदरी यांच्याही भूमिका आहेत.

आराध्या-अबरामची जोडी हिट होईल
अभि-ऐश्वर्याची मुलगी आराध्या आणि शाहरुख खानचा मुलगा अबराम हे मोठे झाल्यावर त्यांची पडद्यावरील जोडी हिट ठरेल, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या नातीचे कौतुक करताना सांगितले. काही दिवसांपूर्वी शाहरुखला रणबीर- दीपिका, रणवीर- दीपिका, अालिया-सिद्धार्थ आणि फवाद- सोनम या जोड्यांपैकी कोणती जोडी आवडते, असा प्रश्न करण्यात आला होता. त्या वेळी शाहरुखने अबराम-आराध्या असे उत्तर दिले होते.

महानायक ७३ व्या वर्षीही बिझी
७३ व्या वर्षातही आमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे काम सुरू आहे. " वजीर' चित्रपटासोबतच सुजोय घोष यांचा "आँखे -२' आणि "पीकू' या चित्रपटाच्या चित्रीकरणात ते व्यस्त आहेत. त्यामुळे बच्चन यांच्या आगामी चित्रपटांकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.