आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकुमार रावने तोडला स्वत:च्याच सिनेमाचा सेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरं तर, कोणत्याही चित्रपटाचा सेट उभारायला, निर्माता लाखो रूपये खर्च करतो. अनेक निर्माते तर आपल्या चित्रपटाच्या सेटचा विमाही उतरवतात. आणि प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर काम करणारे कलाकारही याची जाण ठेवून चित्रीकरणाच्या काळात सेट अगदी तळहाताच्या फोडप्रमाणे जपतात. पण राजकुमार रावने मात्र स्वत:च्याच चित्रपटाचा सेट तोडला.
झालं असं की, तो मोहित सुरीच्या हमारी अधुरी कहानी या सिनेमामध्ये आपल्या पत्नीचा सातत्याने छळ करणारा नव-याच्या भूमिकेत आहे. एका सिनमध्ये जेव्हा राजकुमार रावला विद्या बालनच्या आणि इम्रान हाश्मीच्या प्रेमसंबंधांबद्दल कळतं तेव्हा तो रागाच्या भरात विद्याला मारायला सुरूवात करतो.
ह्या सिनमध्ये खरं तर संहितेच्या अनुसार, राजकुमार रावला विद्याला मारण्यासोबत घरातल्या एक दोन वस्तू तोडायच्या होत्या. पण मारता मारता राजकुमार एवढा बेभान झाला की त्याने घरातला आरसा, स्वयंपाक घरातल्या काही वस्तूंची तोडफोड केलीच पण घरातल्या इतर वस्तू आणि भिंतीही तोडण्यापर्यंत त्याची मजल गेली. हे सगळं पाहत असलेला दिग्दर्शक मोहित सुरी मात्र चुपचाप आपल्या युनिट मेंबर सह शुट करत राहिला.
यांसदर्भात विचारल्यावर मोहित सांगतो, “ राजकुमार राव अगदी त्या भूमिकेत घुसला होता. तो नेहमीच आपल्या भूमिकांमध्ये समरसून जातो. पण तो भूमिकेत एवढा शिरेल असं खरं तर वाटलं नव्हतं. पण हिच तर त्याची युएसपी आहे. तो हे सगळं करत असताना सेटवर टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरली होती. हा सिन आम्ही शांत बसून चित्रीत करत होतो. कॅमेरा राज जे काही करेल ते टिपत होता. त्या सीन नंतर राजकुमारही अक्षरश: गळून पडला. एवढा तो दमून गेला होता.”
राजकुमार रावने आपल्या करीयरमधल्या प्रत्येक चित्रपटात आपल्या छोट्या असो वा मोठ्या प्रत्येक भूमिकेत आपला वेगळा ठसा कसा उमटेल याचाच प्रयत्न केलाय. आता हमारी अधूरी कहानीमधनं राजकुमार राव जास्त लक्षात राहतो. की फिल्मचा लीड हिरो इम्रान ते लवकरच कळेल. पण हे मात्र स्पष्ट दिसतंय, की इम्रानला विद्या आणि राजकुमार या सशक्त अभिनेत्यांपुढे आपल्याला सिध्द करण्याचं नक्कीच टेन्शन आलेलं असणार.