Home | News | Rajkummar Rao Fractures Ankle While Dancing In Lip Sing Battle

या शोमध्ये सहभागी होणे राजकुमार रावला पडले महागात, पाय फ्रॅक्चर, रुग्णालयात दाखल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 23, 2017, 05:17 PM IST

‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित होणारा फराह खानचा ‘लिप सिंग बॅटल’ हा शो सध्या चांगलाच गाजतोय.

 • Rajkummar Rao Fractures Ankle While Dancing In Lip Sing Battle
  ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित होणारा फराह खानचा ‘लिप सिंग बॅटल’ हा शो सध्या चांगलाच गाजतोय. विविध सेलिब्रिटी चित्रपटांच्या प्रमोशनच्या निमित्ताने या शोमध्ये हजेरी लावत आहेत. आपल्या आवडत्या कलाकाराच्या गाण्यावर हे सेलिब्रिटी थिरकताना दिसतात. पण अभिनेता राजकुमार राव याला मात्र फराह खानच्या या शोमध्ये सहभागी होणे चांगलेच महागात पडले आहे.
  राजकुमार रावने अलीकडेच या शोमध्ये हजेरी लावली. मात्र, डान्स करत असतानाच त्याच्या पायाला दुखापत झाली. अंधेरीतील ‘यश राज फिल्म्स स्टुडिओ’मध्ये या शोची शूटिंग सुरू होती.

  ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटातील त्याची सहकलाकार क्रिती सनॉनसोबत तो शूट करत होता. अक्षय कुमारच्या ‘चिंता ता चिता चिता..’ या गाण्यावर तो डान्सचा सराव करत होता. यासाठी त्याला उंचावरून उडी मारायची होती आणि उडी मारतानाच त्याचा तोल गेला आणि पायाला दुखापत झाली. लगेचच त्याला जवळच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
  पायाचा घोटा फ्रॅक्चर झाल्याने काही दिवस त्याला रुग्णालयातच आराम करावे लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. फराह खान आणि शोची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. पायाच्या दुखापतीमुळे राजकुमारने त्याचे पुढील काही शूटिंग रद्द केले आहेत.
  रुग्णालयातील फराह खानसोबतचा एक फोटो त्याने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने फराह आणि प्रेयसी पत्रलेखाचे आभार मानले असून शूटिंग पूर्ण करू न शकल्याने क्रितीची माफीही मागितली आहे.

  राजकुमारने ट्वीट केले, Yes,I broke a leg.Thank u @TheFarahKhan @Patralekhaa9 4 being d best supprt systm & sorry @kritisanon & team couldn't finish d show😭#LipSing
  अलीकडेच राजकुमारची प्रमुख भूमिका असलेल्या 'न्यूटन' या चित्रपटाची ऑस्करसाठी भारताकडून ऑफिशिअल एन्ट्री झाली आहे. याशिवाय 'बरेली की बर्फी' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात क्रिती सेनन प्रमुख भूमिकेत होती. तर येत्या 10 नोव्हेंबर रोजी त्याचा 'शादी में जरुर आना' हा चित्रपट रिलीज होणार आहे. यात त्याच्यासोबत कृती खरबंदा मेन लीडमध्ये झळकणार आहे.

 • Rajkummar Rao Fractures Ankle While Dancing In Lip Sing Battle
  फराह खानचे ट्वीट.
 • Rajkummar Rao Fractures Ankle While Dancing In Lip Sing Battle
  क्रिती सेननचे ट्वीट.

Trending