आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IFFI : राजकुमार रावने स्मृती इराणींची उडवली खिल्ली, केंद्रीय मंत्र्यांनी असा केला पलटवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार राव आणि स्मृती इराणी - Divya Marathi
राजकुमार राव आणि स्मृती इराणी

मुंबई - इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे (IFFI) नुकतेच उद्घाटन झाले. हा शो होस्ट करणाऱ्या राजकुमार रावने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांची स्टेजवर उडवलेली खिल्ली त्याच्या अंगलट आली.  

 

आशियातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल गोव्यात सुरु झाला आहे. या फेस्टिव्हलची सुरुवात इराणी फिल्ममेकर माजिद मजिदी यांचा 'बियाँड द क्लाऊड्स' चित्रपटाने झाली. उद्घाटन सोहळ्याला स्टेजवर माजिदी मजिदी आणि स्मृती इराणी उपस्थित असताना राजकुमार म्हणाला, 'माजिद मजिदी इराणी आहेत, आणि आमच्या मंत्रीही इराणी आहेत.' त्याच्या या विनोदाला सर्वांनीच हसून दाद दिली. स्मृती इराणीही गालातल्या गालात हसल्या. मात्र जेव्हा त्या भाषणासाठी उभ्या राहिल्या त्यांनी राजकुमारच्या विनोदाचा खरमरीत समाचार घेतला. स्मृती म्हणाल्या, 'राजकुमार राव आज तुम्ही फक्त इराणी नावाने एका मंत्र्याची खिल्ली उडवलेली नाही तर यावरुन स्पष्ट होते की सरकार म्हणून आम्ही किती टॉलरेंट आहोत.' 
- स्मृती म्हणाल्या, 'राजकुमार मी तुम्हाला धन्यवाद देते. आता कोणी असे तरी म्हणणार नाही की भाजपवाल्यांनी असे म्हटल्याने एका अॅक्टरचे पाय तोडले.' 
- विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात राजकुमार रावचा एका रियालिटी शोच्या डांस प्रॅक्टिस दरम्यान पाय मोडला होता. पाय मोडलेला असतानाही तो शो होस्ट करत होता. 
- राजकुमार रावसोबत मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने हा शो होस्ट केला होता. 

बातम्या आणखी आहेत...